राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा २० खेळाडूंची निवड करून जर्मनीत मोफत फुटबॉल प्रशिक्षण

मुंबई : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि फुटबॉल क्लब बायर्न यांच्यातील करारामध्ये क्रीडा नैपुण्याचा शोध घेवून निवडलेल्या खेळाडूंना जर्मन येथे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या “एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

फुटबॉल क्लब बायर्न यांच्याशी झालेल्या करारनाम्यामुळे राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा आयोजित करून, त्यातून निवडलेल्या २० खेळाडूंना म्युनिक, जर्मनी येथे जाणे-येणे, तेथील निवास, प्रशिक्षण इ. बाबीवरील खर्च करण्यात येणार आहे. फुटबॉल क्लब बायर्न यांचा लोगो वापरण्याची मुभा दिलेली आहे. तसेच एफ. सी. बायर्न महाराष्ट्र करंडककरिता टी. व्ही ९ मराठी हे मीडिया पार्टनर आहेत.

राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी यांच्याशी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यावतीने करारनामा झाला आहे. बायर्न म्युनिक हा जागतिक पातळीवर लोकप्रिय फुटबॉल क्लबपैकी एक आहे. या करारनाम्यामुळे राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागेल, खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांना फुटबॉल खेळातील तांत्रिक प्रशिक्षण, क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी तसेच योजनाबद्ध प्रशिक्षण, पायाभूत सुविधा यांना चालना मिळणार आहे.

राज्यातून २० खेळाडू जर्मनी येथे या प्रशिक्षणासाठी जाण्याकरीता, क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद अंतर्गत ” एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करण्यात येणार आहे. ही स्पर्धा १४ वर्षाखालील मुलांच्या गटात होईल. या करीता जिल्ह्यातील १४ वर्षाखालील मुलांचे संघ जास्तीत जास्त सहभागी होतील यासाठी शाळांना अवगत करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत भाग घेण्याकरीता dsomumbaisub2020@gmail.com वर किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर (शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, संभाजी नगर समोर आकुर्ली रोड, कांदिवली पू.) संपर्क क्रमांक – ०२२/२८८७११०५ येथे आपले अर्ज दि ०६/०२/२०२३ रोजी दु.३.०० वाजेपर्यंत पाठवावेत. शैक्षणिक संस्था, शाळा, फुटबॉल संघटना व फुटबॉल क्लब यांनी या स्पर्धेत अधिकाधिक संघ सहभागी करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Sat Feb 4 , 2023
मुंबई : क्रीडा विभागामार्फत प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास २० फेब्रुवारी, २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या क्रीडा महर्षींचा गौरव करण्यासाठी शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com