अमरदिप बडगे
गोंदिया – शेतावर काम करत असताना अंगावर वीज पडून मुलाचा मृत्यू झाला आहे. गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु असतांना शेतात काम करत असलेल्या मुलाच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 12 वाजता घडली आहे. कुणाल लक्ष्मण बागळे सलंगटोला (मुंडीपार) असे मृत मुलाचे नाव आहे आणि वडिल थोडक्यात बचावले पण त्यांनाही उपचाराकरिता दवाखान्यात दाखल केले आहे.