यवतमाळ :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे भरती मेळाव्याचे आयोजन दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये यवतमाळ तालुक्यातील 10 नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. युवकांना या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशिक्षण योजनेंतर्गत मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे, उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12 वी पास तसेच आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत. उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
उमेदवाराची आधार नोंदणी असावी, उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे, उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. या संधीचा जिल्ह्यातील सर्व पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य व्ही.जे. नागोरे यांनी केले आहे. मेळाव्यासाठी इच्छुक उमेदवारांनी https://forms.gle/FoiJjuFCUAKcZ3a97 या लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन आयटीआयच्या प्राचार्यांनी केले आहे.