मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

सातारा :- राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रीतिसंगम, कराड येथील समाधीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार अनिल बाबर, बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, महेश शिंदे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्णकुटी या समाधी स्थळावरील ग्रंथालयास भेट दिली. तसेच आयोजित भजन कार्यक्रमास उपस्थिती लावली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कराड येथील प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

Sat Nov 26 , 2022
सातारा :- कराड येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात  आले. या लोकार्पण सोहळ्याला राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते. कराड येथे ५ मजली भव्य प्रशासकीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com