‘किशोर’च्या ‘मूलभूत जीवन कौशल्य’ दिवाळी अंकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई :- शालेय शिक्षण विभागांतर्गत बालभारतीच्यावतीने प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ मासिकाच्या ‘मूलभूत जीवन कौशल्य’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनोज सौनिक, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, किशोरचे संपादक किरण केंद्रे आदी उपस्थित होते.

मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, त्यांना पुस्तकाबाहेरील ज्ञान मिळावे, त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि त्यांच्या कोवळ्या मनावर उत्तम मूल्यसंस्कार व्हावेत या उद्देशाने गेली 52 वर्षे ‘बालभारती’च्या वतीने ‘किशोर’ हे मासिक प्रकाशित केले जाते. ‘किशोर’चा दिवाळी अंक हा नेहमीच आकर्षक आणि नाविन्यपूर्ण राहिला आहे. यंदाचा किशोरचा दिवाळी अंक ‘मूलभूत जीवन कौशल्य’ या विषयावर आधारलेला आहे. बालवयीन आणि किशोरवयीन मुले, अंगभूत बळ, आत्मविश्वास, धाडस यांच्या आधारे संकटांना कशी सामोरी जाऊ शकतील, या प्रश्नाचा वेध कथा, कविता, लेख आणि खेळ अशा माध्यमांतून या अंकात घेण्यात आला आहे. किशोरच्या परंपरेनुसार अंकात अनेक मान्यवरांनी दर्जेदार आणि मनोरंजक लेखन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक, एकूण ०३ गुन्हे उघडकीस

Thu Nov 9 , 2023
नागपूर:- पो. ठाणे बेलतरोडी हद्दीत, बेसा डेअरी, लॉ नं. ५२, मस्जीद जवळ राहणारे फिर्यादी सचिन मधुकर उके वय २८ वर्ष यांनी त्यांची हिरोहोन्डा स्प्लेंडर गाडी क्र. एम. एच ४० एक्स ५१८३ ही लॉक करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पो. ठाणे बेलतरोडी येथे अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!