मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली भूतानचे राजे यांची सदिच्छा भेट

मुंबई :- भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक भारत भेटीवर आले आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांची हॉटेल ओबेरॉय येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, मनीषा म्हैसकर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या सचिव जयश्री भोज आदींसह राज्य शासन आणि भूतानचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूतानचे राजे जिग्मे वांगचूक यांना गणेश मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देऊन त्यांचा सत्कार केला.            मुख्यमंत्री शिंदे यांनी भूतानचे राजे जिग्मे वांगचूक यांच्याशी संवाद साधताना सांगितले की, महाराष्ट्र आणि भूतान यांच्यात समान सांस्कृतिक वारसा आहे. दरवर्षी अजिंठा, वेरूळ येथील लेण्यांना भूतानचे पर्यटक भेट देतात, तर महाराष्ट्रातील पर्यटकांचे भूतान हे आवडीचे ठिकाण आहे. भूतानमध्ये गुंतवणूक, आर्थिक प्रकल्पांना चालना देण्यासाठी विशेष प्रशासकीय क्षेत्र कार्यान्वित करण्यात येईल. त्यामुळे महाराष्ट्र आणि भूतान यांच्यातील संबंध दृढ होण्यास मदत होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भूतानबरोबरच संबंध आणखी वृद्धिंगत होतील. तसेच भूतानबरोबरील परस्पर हिताचे आणि द्विपक्षीय सहकार्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार भूतानला सर्व सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भूसंपादन मावेजासाठी निधी उपलब्ध करून देणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Wed Nov 8 , 2023
– जामनेर मतदारसंघातील तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत अधिग्रहीत जमिनींच्या भूसंपादन मावेजा संदर्भात बैठक मुंबई :- जामनेर मतदारसंघातील तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत जलसंपदा प्रकल्पांकरीता अधिग्रहीत जमिनींच्या भूसंपादन मावेजासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे जामनेर मतदारसंघातील तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत जलसंपदा प्रकल्पांकरीता अधिग्रहीत केलेल्या जमिनींचे भूसंपादन संदर्भातील बैठक झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com