मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मणिपूरसह आसामच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून साधला संवाद मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्याची केली विनंती

मुंबई :- मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.

मणिपूरमध्ये अडकलेल्या 22 विद्यार्थ्यांना विशेष विमानाने महाराष्ट्रात आणण्यात येणार असून तत्पूर्वी या विद्यार्थ्यांना मणिपूरहून आसाममध्ये आणण्यात येईल. मणिपूरहून आसामपर्यंत आणताना या विद्यार्थ्यांना विशेष सुरक्षा पुरविण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कविवर्य सुरेशभट्ट सभागृहात उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराला सुरूवात

Mon May 8 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सुदर्शन स्पोर्टिंग क्लब नागपूर द्वारा आयोजित उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराला शनिवारी (ता. 6) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सुरुवात झाली. शिबिराचे उद्घाटन नागपूर नगर आखाडा संघटन सचिव ईश्वर झाळे व नागपूर कुस्ती अस्थायी समीती सचिव हरिहर भावडकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी मनपा क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, सुदर्शन स्पोर्टिंग क्लब नागपूरचे अध्यक्ष कृष्णा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com