मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घेतले अयोध्येत प्रभु श्री रामचंद्राचे दर्शन

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अयोध्या येथील  प्रभु श्री रामचंद्राच्या जन्मस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज अयोध्येत आगमन झाले. यावेळी उभयतांचे  शहरात मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मंत्री, महाराष्ट्र राज्याचे मंत्री, आमदार यासह स्थानिक भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  अयोध्येतील  प्रभु श्री रामचंद्रांचे दर्शन घेतले. तसेच महाआरतीत सहभागी झाले. यानंतर अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या  राम मंदीर परिसराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी करून स्थापत्यविषयी माहिती जाणून घेतली.
याप्रसंगी  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, राज्य उत्पादन शुल्क मंत्री  शंभूराज देसाई, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, कामगार मंत्री सुरेश खाडे, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह खासदार राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, कृपाल तुमाणे, सदाशिव लोखंडे, श्रीरंग बारणे  आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रोजा व नमाजमुळे मन शांती मिळते व मनुष्य सत्याच्या मार्गाकडे जातो-डीसीपी श्रवण दत्त.

Sun Apr 9 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 09 :- पवित्र रमजान महिन्यात रोजा व नमाजमुळे मनाला शांती मिळते ,जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण होते.व मनुष्य सत्याच्या मार्गाकडे जातो .या पवित्र महिन्यात सर्व मुस्लिम बांधव मनापासून अल्लाप्रति ईबादत करतात .रमजान निमित्त एक महिना उपवास करून पाच वेळा नमाज अदा करतात ज्यामुळे सामाजिक सलोखा व बंधुभाव निर्माण होतो .असे मौलिक मत पोलिस उपायुक्त श्रवण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com