साहित्य अकादमी पुरस्कार प्रक्रियेत बदल

नवी दिल्ली :- साहित्य अकादमीने मान्यता दिलेल्या २४ भारतीय भाषांमधील दरवर्षी दिल्या जाणाऱ्या देशातील सर्वात प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.

साहित्य अकादमीने पहिल्यांदाच लेखक, प्रकाशक आणि त्यांच्या हितचिंतकांकडून वर्ष २०२५ च्या मुख्य पुरस्कारासाठी 24 भाषांमधील पुस्तके निवडण्यासाठी आमंत्रित केले आहे. पुस्तके सादर करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२५ आहे.

२०२५ च्या पुरस्कारांसाठी, २०१९ ते २०२३ (१ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२३) या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांची एक प्रत अर्ज भरून विचारार्थ पाठवता येईल.

याबद्दलची सविस्तर माहिती अकादमीच्या https://sahitya-akademi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही माहिती देशभरातील 24 भाषांमधील पोहचविण्याचे आवाहन सचिव के. श्रीनिवासन यांनी या प्रसिद्धी प्रत्रकाव्दारे केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कुणाल, सरोज लाल माती कुस्तीत अव्वल - खासदार क्रीडा महोत्सव लाल माती कुस्ती स्पर्धा

Sat Feb 1 , 2025
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील लाल मातीतील कुस्ती स्पर्धेमध्ये रामटेक येथील कुणाल माहुर्ले आणि मौदा येथील सरोज देशमुख यांनी आपापल्या गटात बाजी मारुन जेतेपदाचा खिताब पटकाविला. महाल येथील चिटणीस पार्कमध्ये झालेल्या लाल मातीतील कुस्ती स्पर्धेत एकूण १३३ मल्लांनी सहभाग नोंदविला. ४५ किलो वजनगटातील अंतिम लढत कुणाल मोहुर्ले आणि प्रिंस दमाहे या रामटेकच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!