जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक कक्ष येथे करावी नोंदणी
चंद्रपूर १९ मे – महाराष्ट्रातील जिल्हा परिषद पंचायत समिती ग्राम पंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगर पालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास ( ओबीसी, व्हीजे एनटी, विशेष मागास प्रवर्ग ) आरक्षण देण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग घटित केला आहे. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणुन घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणारी विविध सामाजिक संघटना यांची निवेदनाने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे.
विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे दिनांक २८/०५/२०२२ शनिवार रोजी सायंकाळी ४.३० ते ६. ३० यावेळेत समर्पित आयोग भेट देणार असून भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना मांडता यावीत आणि निवेदन देता यावे यासाठी संबंधी विभागीय आयुक्त कार्यालयात आपली नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक कक्ष येथे दिनांक २७. ०५. २०२२ रोजी सायंकाळी ६. ०० वाजेपर्यंत करावी, असे आयोगामार्फत निवेदन करण्यात आले आहे. तरी चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीतील नोंदणीकृत राजकीय पक्ष, नागरिक, विविध सामाजिक संस्था व संघटना यांनी याची नोंद घ्यावी, असे चंद्रपूर मनपा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे.