३ स्वच्छता रॅलींना मोठा प्रतिसाद
३ नवीन स्वीपींग मशीनचे लोकार्पण
रॅलीस जिल्हाधिकारी यांची उपस्थीती
चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेने १७ डिसेंबर रोजी आयोजीत केलेल्या ३ स्वच्छता रॅलींद्वारे शहरातील नागरीकांना स्वच्छतेचा संदेश दिला. रामाळा तलाव, पठाणपुरा दरवाजा, महाकाली मंदीर या तिन्ही ठिकाणाच्या पदयात्रेस जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मनपा अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन प्रारंभ करण्यात आला.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्याच्या कालावधीत स्वच्छता अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून यामध्ये “इंडियन स्वच्छता लीग” हा स्वच्छता विषयक देशव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १७ सप्टेंबर रोजी ” युथ स्वच्छता रॅलीचे ” आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाअंतर्गत सकाळी ७ वाजेपासुन स्वच्छतेस सुरुवात करण्यात आली. स्वच्छता जिंगलद्वारे नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात येत होते. रामाळा तलावातील इकॉर्निया काढण्यात आले व परिसरात सौदर्यीकरण करण्यात आले पठाणपुरा दरवाजा येथील परिसराची स्वच्छता, महाकाली मंदिर येथील परिसर व पुरातन बावडीची स्वच्छता करून भाविकांसाठी निर्माल्य कलश, स्टीलचे कचरा कुंडी लावण्यात आली व सौदर्यीकरण करण्यात आले. या सर्व परिसरांमध्ये नव्याने वृक्षारोपण करण्यात आले. परिसरातील दुकानदारांमधे स्वच्छतेची जनजागृती करण्यात आली.
मनपाच्या ३ नवीन स्वीपींग मशीनचे लोकार्पणही या प्रसंगी करण्यात आले. स्वयंसेवी संस्था,महिला बचत गट,मनपा अधिकारी कर्मचारी यांच्यासोबतच महाविद्यालयीन युवकांचा मोठया प्रमाणात सहभाग असलेल्या तिन्ही रॅली गांधी चौक येथे एकत्र आल्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास हार घालुन वंदन करण्यात आले. येथे जगदीश नंदुरकर यांच्या पथनाट्य चमूद्वारे स्वच्छतेचा संदेश करण्यात आला तसेच (https://innovateindia.mygov.in/swachhyouthrally/) या लिंकद्वारे चंद्रपूर स्वच्छता टीममध्ये नोंदणी केलेल्या स्वयंसेवकांची ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. यात अंचलेश्वर वॉर्ड येथील यशवंत निखार यांना स्मार्ट वॉच पारितोषिक लाभले.
या पुर्ण उपक्रमास इको प्रो संस्था, आरुषी सोशल वर्क फाउंडेशन, योग्य नृत्य परीवार, पतंजली परिवार, ज्युबली हायस्कूल, एफइएस गर्ल्स स्कूल, सोशल वर्क महाविद्यालय, सावित्रीबाई फुले शाळा, महाकाली मंदीर व्यवस्थापन चमु, पथनाट्य चमु, उत्कृष्ट महिला बहुद्देशीय संस्था, शहरातील स्वच्छता दुत उषा बुक्कावार, मच्छीमार संस्था चंद्रपूर संघर्ष बचाओ समिती यांचे विशेष सहकार्य लाभले.
केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाने स्वच्छतेचा अमृत महोत्सव साजरा करताना “इंडियन स्वच्छता लीग” हा राष्ट्रीय उपक्रम जाहीर केला असून त्यामध्ये देशातील १८०० हून अधिक शहरे सहभागी होत आहेत. या अनुषंगाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्यात स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.