संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- नदीच्या पावन काठावरील ॐ महाकाली मंदिर सत्रापुर कन्हान येथे चैत्र शुक्ल पंचमी (दि.१३) एप्रिल ला घटस्थापना करून धार्मिक कार्यक्रमासह चैत्र नवरात्री उत्सव साजरा करण्यात येईल.
ॐ महाकाली सेवा समिती सत्रापुर कन्हान व्दारे दरवर्षी प्रमाणे चैत्र शुक्ल पंचमी शनिवार (दि.१३) एप्रिल २०२४ ला सकाळी १० वाजता कन्हान नदीच्या पावन काठावरील प्रसिध्द ॐ महाकाली मंदिर सत्रापुर कन्हान येथे संदजी गुप्ता यांचे हस्ते विधीवत पुजा अर्चणा करून घटस्थापना करून चैत्र महाकाली नवरात्री उत्सवाची सुरूवात करण्यात येईल. नऊ दिवस जस, भजन, पुजा सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करून चैत्र महाकाली नवरात्री उत्सव साजरा करून रविवार (दि.२१) एप्रिल ला सकाळी ८ वाजता पावन कन्हान नदीच्या पात्रात घट विर्सजन करून महाप्रसाद वितरण करून थाटात चैत्र नवरात्री उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. या चैत्र महाकाली उत्सवात नागपुर जिल्हा व परिसरातील भाविक भक्तानी मोठया संख्येने उपस्थित राहुन धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन ॐ महाकाली सेवा समिती सत्रापुर-कन्हान चे प्रकाश कडु हयानी केले आहे.