केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न..

संदीप बलविर,तालुका प्रतिनि

धीकेंद्रास्तरीय चॅम्पियनशिप चा मान सोनेगाव (बोरी) जी प शाळेला

नागपूर/६ जाने :- तालुक्यातील रामा केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किन्हाळमाकडी या ठिकाणी नुकत्याच पार पडल्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून किन्हाळ माकळी ग्रा प च्या सरपंच चंदाताई श्रीकांत चिकनकर ह्या होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सागरजी धांडे साहेब हे होते.या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रतिभा परचाके, ग्रामपंचायत सदस्य कल्पनाताई नामूर्ते, टिकारामजी भोंग तसेच श्रीकांतजी चिकनकर केंद्रप्रमुख वनमाला डोकरीमारे मॅडम आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा स्पर्धेचे ध्वजारोहण करून करण्यात आली. त्यानंतर मशाल प्रज्वलित करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्‌घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख वनमालाताई डोकरीमारे यांनी केले. पाहुण्यांचे शब्दसूमनाने स्वागत उच्च प्राथमिक शाळा रामा येथील विद्यार्थिनीनी केले. या स्पर्धेत एकूण रामा केंद्रातील सात शाळांनी भाग घेतला. अतिशय उत्साह आणि खिलाडू वृत्तीने या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेतील सांघिक गटात प्रथम क्रमांक उच्च प्राथमिक शाळा सोनेगाव बोरी वरिष्ठ कबड्डी मुले ,वरिष्ठ कबड्डी मुली, कनिष्ठ कबड्डी मुले व वरिष्ठ लंगडी मुली यांनी पटकावला.

सांघिक गटातील द्वितीय क्रमांक उच्च प्राथमिक शाळा रामा यांनी पटकावला. विजेत्या चमुना बक्षीस वितरण करण्यात आले. विशेष बक्षीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किन्हाळमाकडी या शाळेला देण्यात आले. समुह नृत्य स्पर्धेत उच्च प्राथमिक शाळा सोनेगाव बोरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर समुह नृत्य स्पर्धेत दुसरा क्रमांक उच्च प्राथमिक शाळा रामा या शाळेचे पटकावला . वैयक्तिक खेळात उच्च प्राथमिक शाळा रामाने पटकवला. या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेची चॅम्पियनशिप उच्च प्राथमिक शाळा सोनेगाव बोरी ला देण्यात आली.

या कार्यक्रमाचे संचालन हिरामण तेलंग यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजेंद्र घावट सर यांनी मांनले.

या कार्यक्रमाला क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी फुलझले सर ,शंभरकर सर ,शेंडे सर, मिलमिले मॅडम, कडू मॅडम, घोडपागे मॅडम ,मोरे मॅडम, आकरे मॅडम, दवंडे सर,खंगार सर,तिमांडे सर यांनी विशेष मेहनत घेतली .त्याच प्रमाणे ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सुद्धा या कार्यक्रमाला फार सहकार्य केले. गावातील बहुसंख्य नागरिकांनी या कार्यक्रमाला मदत केली. शेवटी वंदे मातरम् होऊन केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता झाली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विद्यापीठांनी गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्त याचे नियोजन करावे - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  

Fri Jan 6 , 2023
कुलगुरू संयुक्त मंडळाची बैठक संपन्न मुंबई : विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून नवीन संकल्पना आणि नावीन्यता यावर विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करीत असताना काही अडचणी येऊ शकतात. परंतु गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्त याचे नियोजन करावे, विद्यार्थी हितासाठी शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचाविण्यासाठी विशेष प्रयत्न करावा. असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राजभवन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!