यवतमाळ :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पुसदच्यावतीने आदिवासी लाभार्थ्यांना केंद्रवती अर्थसंकल्प योजनेंतर्गत आदिवासी समाजातील लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभा देण्यात येणार आहे. त्यासाठी दि.7मार्च रोजी लाभार्थी निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.
पात्र लाभार्थ्यांना छोटा व्यवसायासाठी अर्थसहाय्य, काटेरी तारकुंपनसाठी अर्थसहाय, सोलार झटका मशिनसाठी अर्थसहाय, ताडपत्रीसाठी अर्थसहाय, कोलाम लाभार्थ्यांकरीता छोटा व्यवसाय करीता अर्थसहाय्य या योजनांच्या लाभार्थ्यांची निवड संगणकीय लॉटरी पध्दतीने प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद उप येथे दि.7 मार्च रोजी दुपारी 2 वाजता करण्यात येणार आहे. वरील योजनेच्या लाभासाठई अर्ज भरलेल्या लाभार्थ्यांनी निवड प्रक्रिये करीता उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.