– हंसराज अहीर अध्यक्ष राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोग न्यू दिल्ली
नागपूर :-दि.14/12/2022 ला सुधीर दिवे यांच्या माध्यमातून हंसराज अहीर अध्यक्ष राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोग नई दिल्ली यांची त्यांचे शासकीय कार्यालय येथे भेट घेतली व समस्या बाबत निवेदन केले. या विषयावर लवकरच निर्णय घेऊन समस्या चे निराकरण करू असे आस्वस्त केले. व राजेशकुमार अतिरिक्त सचिव यांना निर्देश दिले. याच संदर्भात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची त्यांचे शासकीय निवासस्थान दिल्ली येथे भेट घेऊन पवार मिशन संदर्भातील सविस्तर माहिती दिली. तसेच महेंद्रभाई मुंजपारा केंद्रीयमंत्री खासदार सुनील मेंढे, खासदार रामदास तड्स, मनोहर धोंडे यांची भेट घेऊन पवार मिशन बद्दल माहिती दिली. व हे प्रकरण लवकरच निकाली काढू असे सर्वांनी आस्वत केले. लवकरच समाजाला आनंदाची बातमी मिळेल असे या वेळी जाणवले निवेदन देतांना सुधीर दिवे, श्रावण फरकाडे मोरेश्वर भादे सोबत होते.