नागपूर :- नंदनवन परिसरातील जगनाडे चौकातील नुकत्याच झालेल्या 8 डिसेंबर रोजी संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराजांच्या पुतळ्याला, महाराजांजच्या जयंती निमित्त, अखिल तेली समाज सांस्कृतिक सेवा संस्था व वर-वधू सुचक मंडळातर्फे आयोजित जयंती समारंभात तेली समाजाचे आराध्य दैवत व जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या बारा टाळकऱ्यापैकी एक व तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणी नदीत बुडवल्यानंतर अवघ्या तेरा दिवसांत आपल्या लेखणीने लिहुन काढणारे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्यास संस्थेचे सल्लागार व सदस्य डॉ.अशोकराव सागोते, बबनराव तेलरांधे, गिता महाकाळकर व कृतल आकरे, संस्थेचे अध्यक्ष अरूणराव धांडे यांच्या कडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव किशोर भिवगडे, वसंतराव खोंड, राजुजी मुंडले, श्रीकांत क्षिरसागर, पियुश आकरे, भोजराज मस्के, बाळु गुळघाणे, सुर्यभान चकोले, पियुश आकरे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराजांची जयंती साजरी.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com