कन्हान :- राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब भोसले आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे कार्यक्रमा सह साजरी करण्यात आली.
रविवार (दि.१२) जानेवारी २०२५ सायंकाळी ७ वाजता राजमाता जिजाऊ मॉ साहेब भोसले आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे श्री अशोक खंडाईत गुरुजी यांचे अध्यक्षेत तर प्रमुख अतिथी सौ अल्काताई कोल्हे यांचे हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस दिप प्रज्वलित करून पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच सर्व उपस्थित सभासद व वाचकांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात दिनकरराव मस्के कोषाध्यक्ष यांनी राजमाता जिजाऊ मॉ साहेब भोसले तसेच स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी व जीवना विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी आणि सुमित घोरपडे, स्वप्निल भेलावे हयांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मनोहर कोल्हे, रजत पाटील, भुपेश भोंगाडे, कस्तुरी कोल्हे, गौरव बोरो, अनुज टिकले, कृष्णाली कोल्हे, ध्रुवी नांदुरकर, अभिषेक निमजे, रमण चव्हाण, अनिकेत दिवे, आदी सभासद व वाचकांच्या उपस्थित जन्मोत्स व साजरा करण्यात आला. सुत्रसंचालन कृणाल कोल्हे लिपिक यांनी तर आभार प्रदर्शन किशोर चिकटे यांनी केले. सर्व उपस्थितांना अल्पोहार वितरण करून कार्य क्रमाची सांगता करण्यात आली.