संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 2 :- १ मे महाराष्ट्र दिवसाचे औचित्य साधून कामठी तालुक्यातील आजनी येथे ग्राम पंचायतीच्या माध्यमातून सकाळी झेंडावंदन करण्यात आले तर सायंकाळी हनुमान देवस्थान हॉलमध्ये ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचा श्रम गौरव आणि गावातील विविध क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या कर्तृत्वाचा शाल श्रीफळ देऊन गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समितीचे माजी सभापती उमेश रडके यांनी अध्यक्षीय भाषणात सर्वांच्या कर्तृत्वाचा उल्लेख केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नयन उकेबोंदरे या मुलीने लावणी सादर केली.
या प्रसंगी पोलीस पाटील बळवंतराव रडके, सरपंच संजय जीवतोडे, उपसरपंच हेमराज दवंडे, सचिव आतिशजी देशभ्रतार, भगवंतराव रडके, दिनेश मेश्राम, शंकर भोयर, गणपत झलके, गायत्री हरणे, हेमलता उकेबोंदरे, श्वेता चौधरी, अंकिता हेटे, अनिकेत इंगोले, दिवाकर घोडे, मेघा वाट, तीमाजी खंडाते, सुनील वाणी, शंकर वानखेडे, पुंजाराम मारोटकर, वसंता भोयर, रामहरी लाडस्कर, राहुल शेळके, रंजना दवंडे, दयावंती उकेबोंदरे, मंगल किरनायके, विजय भोयर, बंडू भोयर यांची विशेष उपस्थिती होती. संचालन लिलाधर दवंडे यांनी केले तर या सोहळ्यात गुण गौरव म्हणून डॉ अली, तुकारामजी लायबर, नामदेव भगत, कवडू चिंचुलकर, अर्चना लोहकरे, अनिता हरणे, रामदिन हरणे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिया चव्हाळे, योगेश नागापूरे, नारायण वैद्य, करण उकेबोंदरे, धंदरे मामू यांनी सहकार्य केले. आभार प्रदर्शन आणि महाराष्ट्र गीत मृणाल वाट हिने सादर केले.