जागतिक हिवताप दिन साजरा

गडचिरोली :- दर वर्षी 25 एप्रिल हा दिवस “जागतिक हिवताप दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. हिवताप नियंत्रण तसेच निर्मूलनासाठी निरंतर प्रयत्न आणि वचनबद्धता याची आठवण करून देण्यासाठी हा दिवस पाळला जातो.”मलेरिया विरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी, गतिमान करूया लढा मलेरियाला हरविण्यासाठी”ही यावर्षीचीमुख्य संकल्पना आहे. जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून गडचिरोली शहरातून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभातफेरी ची सुरुवात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे व राज्य किटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. प्रभातफेरी द्वारे हिवताप आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. यात जिल्हा सामान्य रुग्णालय येथील परिचर्या प्रशिक्षणार्थी, आशा स्वयंसेविका, सर्वअधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्या हिवताप विषयक घोषवाक्याच्या निनादात हि प्रभातफेरी मुख्य मार्गाने फिरवून महिला व बाल रुग्णालयात विसर्जित करण्यात आली.जिल्हा हिवताप कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय, फॅमिली हेल्थ इंडिया एम्बेड प्रोजेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे तर प्रमुख अतिथी राज्य किटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रफुल गोरे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. पंकज हेमके, जिल्हा प्रशिक्षण केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. रुचिता खांडरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत आखाडे, साथरोग अधिकारी डॉ. रुपेश पेंदाम, हिवताप नोडल अधिकारी डॉ. नन्नावरे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. लोकेश कोटवार तसेच फॅमिली हेल्थ इंडिया एम्बेड प्रोजेक्ट जिल्हा समन्वयक संघरक्षक मुंजमकर मंचावर उपस्थित होते.जिल्हा हिवताप अधिकारी यांनी प्रस्ताविकेत्तून जिल्ह्यातील हिवताप परिस्थिती सांगितली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हा आरोग्य अधिकारी प्रताप शिंदे यांनी हिवताप रोगाचा प्रसार कमी करण्यासाठी व हिवतापाने मृत्यु चे प्रमाण कमी करण्यासाठी नवीन संकल्पनांचा वापर करणे यावर मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख अतिथी राज्य किटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप यांनी हिवताप आजाराबाबत मार्गदर्शन केले. सन 2023-24 या वर्षात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हिवताप व हत्तीरोग आजार प्रतिबंध बाबत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आरोग्य संस्थेतील आशा स्वयंसेविका जयश्री कोपुलवार प्रा. आ. केंद्र कसनसूर, बबिता किरंगे, प्रा. आ. केंद्र गोडलवाही, शांती बोगा, प्रा. आ. केंद्र कोटगुल, हायसला मोहुर्ले, प्रा. आ. केंद्र कसनसूर यांना मान्यवरांचे हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन राजेश कार्लेकर यांनी केले तर आभार  प्रकाश बारसागडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पद्मावती माता की पालकी निकली

Fri Apr 26 , 2024
नागपुर :- श्री दिगंबर जैन सेनगण मंदिर लाडपुरा इतवारी से बुधवार को रात्रि पद्मावती माता की पालकी निकली. इससे पूर्व शरद कुटे के शास्त्रीनगर के निवासस्थान से पद्मावती माता की पालकी बाजे गाजे के साथ श्री दिगंबर जैन सेनगण मंदिर के सन्मति भवन पहुंची. सेनगण मंदिर की पद्मावती माता की प्रतिमा का सन्मति भवन में आगमन हुआ। उपस्थित भक्तों ने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com