जागतिक बाल कामगार विरोधी दिवस साजरा

यवतमाळ :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बाल कामगार विरोधी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.ए. नहार होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाचे दुकाने निरीक्षक विजय गुल्हाणे व रविंद्र जतकर हे उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित दुकाने निरीक्षक रविंद्र जतकर यांनी उपस्थित पॅरा विधी स्वंयसेवक यांना बाल कामगार विरोधी दिवसाबाबत विस्तृत माहिती दिली. तसेच 1 ते 14 वर्षाच्या मुलांना व मुलींना कामावर ठेवता येत नाही तसेच त्यांना ठेवल्यास आस्थापना मालकास 20 ते 50 हजार रूपयाचा दंड व 2 ते 3 वर्षांची शिक्षा किंवा यापैकी दोन्ही होवू शकते याबाबत माहिती दिली.

वय 14 वर्षाच्या वरील मुलांना कामावर ठेवता येते, परंतू त्याला सर्व सोईसुविधा पुरविणे हे आस्थापना मालकाचे काम आहे. जसे शाळेच्या वेळेवर त्याला सुट्टी देणे, दोन ते तिन तासांनी त्याला ब्रेक देणे इत्यादी अनेक उदाहरणे दिली. 14 वर्षावरील मुलांना कामावर ठेवतांना धोकादायक जागी कामावर ठेवता येत नाही. अधोकादायक जागी कामावर ठेवता येते, याबाबत देखील माहिती दिली.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या कार्यालयात कार्यरत विधी महाविद्यालयाचे, समाजकार्य महाविद्यालयाचे पॅरा विधी स्वंयसेवक यांच्यासह यवतमाळ येथील स्टेंट बँक चौक, हनुमान आखाडा चौक, इंदिरा मार्केट, सराफा लाईन तसेच इतर दुकानांमध्ये जावून बाल कामगार काम करीत आहे किंवा नाही याबाबतची पाहणी करून आस्थापना दुकान मालकांना बाल कामगार कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा याबाबत माहिती देण्यात आली.

बालकामगार ठेवल्यास मालकास दंड व शिक्षा किंवा यापैकी दोन्ही होवू शकतो याबाबत त्यांना मार्गदर्शन केले. येथे बाल कामगार काम करीत नसल्याचे पत्रके दुकानामध्ये दर्शनी भागात लावण्यात आले. कार्यकमास पॅरा विधी स्वयंसेवक, सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालयाचे कर्मचारी तसेच जिल्हा बाल संरक्षण कार्यालय, चाईल्ड लाईनचे कर्मचारी, उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जर्जर मकानों की सूची तैयार नहीं है

Fri Jun 14 , 2024
– अतिक्रमण सह जैसे तैसे खड़ी जर्जर इमारतें,राजनीति से प्रेरित   नागपुर :- मनपा आयुक्त एवं प्रशासक डाॅ. अभिजीत चौधरी ने शहर के जर्जर मकानों की सूची तैयार कर कार्रवाई करने का निर्देश दिया. हालांकि, किसी भी अंचल कार्यालय ने जर्जर मकानों की जानकारी नहीं दी है.क्यूंकि अतिक्रमण सह जैसे तैसे खड़ी जर्जर इमारतें,राजनीति से प्रेरित हैं. इसलिए नगर निगम के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com