नागपूर :- सोनझारी आदिवासी मोहल्ला प्रभाग क्रमांक ३० येथे तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मोहन मते, शिवसेना माथाडी कामगार सेनेचे नागपूर शहर अध्यक्ष सिध्दु कोमजवार, नगरसेवीका मुळे, ज्योती देवघरे, कुंनदेलवार, कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी समाजाचे महागुरू अर्जुन बेहरे, अध्यक्ष रमेश बेहरे, कोषाध्यक्ष अशोक पत्रे, आदिवासी समाजाचे जेष्ठ आत्माराम पत्रे, प्रविण विघरे, संग्राम भीमारे, सुधीर पत्रे, वसंत बेहटे, पहनिया निमार, दिपक भिमारे, विहारी पत्रे, रणजीत बेहरे, दिपक मडावी, संपत बेहरे, प्रदिप पत्रे, सोनझारी व ईतर ही समाजातील महीला व पुरुष उपस्थित होते. यावेळी छोट्या छोट्या बालगोपालांची अफाट गर्दी जमलेली होती. छोटे छोटे मुले वेगवेगळ्या वेशभूषेत सहभागी झाले होते. तान्या पोळ्यात छोट्या – छोट्या मुलांनी शंकरजीचे रूप, महाकालीचे रूप असे देवतांच्या वेशभूषेत प्रगटले होते.
छोटे छोटे नंदी बैल वेगवेगळ्या सजावटीत आलेले होते. वेशभूषेचे लहान मुलांना पारीतोषीक देण्यात आले व नंदी सजावटीचे वेगळे पारीतोषीक देण्यात आले. सर्वांना बिस्कीट व चाकलेटचे वितरण करण्यात आले. अशा प्रकारे सोनझारी येथे तान्हा पोळा साजरा करण्यात आला.