वर्धा :-वर्धा शहरात संत रामपाल महाराजांच्या मार्गदर्शनात संत गरिबदास महाराजांच्या बोध दिवसानिमित्ताने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. संत रामपाल महाराजांच्या कृपेने 27 फेब्रुवारी रोजी,तीन वाजता पासून तर सायंकाळी पाच यादरम्यान अध्यात्मिक चेतना आणि सद्गुरु शोभायात्रा काढली असून शोभायात्रेचा मार्ग महादेव मंदिर मार्गे बस स्टेंड चौक, मेन मार्केट मार्गे बजाज चौक महादेव मंदिर येथे समापण करण्यात आला.
या आध्यात्मिक चेतना यात्रा व सद्गुरु शोभायात्रेच्या प्रीत्यर्थ भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. भक्तांनी शोभायात्रेत आनंद व्यक्त केला. यावेळी भक्तांची संख्या जवळपास 500 लोकसंख्या होती. संत रामपाल महाराज लोकांना धर्मग्रंथानुसार भक्ती करायला लावतात आणि तीच भक्ती करून ते विकार मुक्त सुसंस्कृत समाजाची निर्मिती करित आहेत. ज्याद्वारे लाखो भाविकांनी अमली पदार्थ सोडणे, हुंडा न घेणे, न देणे, यासारखे दुर्गुण सोडवले आहेत. लाच न घेणे, चोरी न करणे, फसवणूक न करणे, मुलगा- मुलगी यांच्यात भेद न करणे, सोन्याचे दागिने न घालणे, चांगली भक्ती केल्याने लाखो भाविकांना आध्यात्मिक लाभ झाला आणि घातक आजारापासून मुक्ती मिळाली.
संत रामपाल महाराज सतयुगासारखा समाज घडवत आहे. यासाठी बोध दिवसा निमित्ताने भव्य रॅली काढण्यात आली. याप्रसंगी आयोजक समस्त भक्तजन भास्कर दास,मनोज दास कोडवानी ,अरुण दास निखाड़े, सुभाष दास सहारे जैसल दासी सुथार श्रावण दास सयाम, शंकर दास ठाकरे मोहन दास ठवकर, केवलराम दास नटे वैभव दास सयाम, राजेश दास उरकुड़े यांची शोभायात्रेत उपस्थिती होती.