संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– हनुमान जयंती शोभायात्रेने कामठी शहर दुमदुमले.
-ठीक ठिकाणी स्वागत व प्रसादाचे वितरण ,नयनरम्य चित्ररथाने कामठीकरांचे पारडे फेडले
कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा हनुमान जन्मोत्सव निमित्त 7 एप्रिल ला हनुमान जयंती उत्सव समितीच्या वतीने हनुमान जन्मोत्सव शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान शोभायात्रा शुभारंभ वेळेदरम्यान निसर्गाने अवकाळी पाऊस केला मात्र भक्तगणांनी या पावसाचा स्वागत करीत भर पावसात शोभायात्रेचा शुभारंभ केला तसेच या हनुमान जयंती उत्सव शोभायात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून हनुमान शोभायात्रेने कामठी शहर दुमदुमले. एकीकडे हनुमान जन्मोत्सव तर दुसरीकडे असलेला रमजान महिना त्यातही ही शोभायात्रा मुस्लिम समुदायाच्या रहिवासी क्षेत्रातून जात असताना मुस्लिम समाजबांधावाणी या हनुमान जन्मोत्सव शोभयात्रेचे जंगी स्वागत केले.ज्यामुळे हिंदू-मुस्लिम भाई भाई चा कौमी एकतेचा नारा हा कायम असल्याचे निदर्शनास आले तर मागील कित्येक वर्षापासून हनुमान हन्मोत्सव समितीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या हनुमान जन्मोत्सव शोभायात्रेची परंपरा ही कायम ठेवत अवकाळी पावसात ही निघालेल्या या हनुमान जन्मोत्सव शोभयात्रा कौमी एकतेच्या सौहाद्रपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.
या हनुमान जन्मोत्सव शोभायात्रेचा शुभारंभ गांधी चौक येथे सजविलेल्या रथावरील हनुमानजीच्या मूर्तीची भाजप प्रदेश अध्यक्ष व माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते पूजा आरती करून करण्यात आली. यावेळी खासदार कृपाल तुमाने,आमदार टेकचंद सावरकर, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, माजी खासदार विलास मुत्तेमवार ,माजी आमदार देवराव रडके,माजी जी प अध्यक्ष निशा सावरकर, पोलीस उपायुक्त श्रवण दत्त सहायक पोलीस उपायुक्त पी एन नरवाडे ,तहसिलदार अक्षय पोयाम, मुख्याधिकारी संदीप बोरकर,ठाणेदार दीपक भिताडे ,भरत क्षीरसागर, राजेश शर्मा ,अजय अग्रवाल ,पप्पू अग्रवाल, माजी नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत अन्सारी ,माजी नगराध्यक्ष माया चवरे,माजी नगराध्यक्ष प्रमोद उर्फ गुड्डू मानवटकर ,माजी नगराध्यक्ष नीरज यादव,माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान, माजी सभापती नीरज लोणारे, कपिल गायधने, रतनलाल बरबटे, मुलचंद सीरिया, लक्ष्मण संगेवार, गिरीश संगेवार, माजी नगरसेवक लालसीग यादव,संजय कनोजिया, प्राध्यापक मनीष वाजपेयी ,चंद्रकांत चौबे,कृष्णा यादव,राधेश्याम हटवार,मुकेश यादव, शोएब असद, रामेश्वर बावनकर, लाला खंडेलवाल प्रामुख्याने उपस्थित होते. ही शोभायात्रा बँड ,डीजे ,ढोल ताशे, फटाक्याच्या आतिषबाजी आदिवासी नृत्य ,विविध वेशभूषेत राजे महाराजे, विविध नयन रम्यचित्र रथाची शोभायात्रा पोरवाल चौक ,फेरूमल चौक, रब्बानी चौक, फुलओली चौक, लाला ओली , बोरकर चौौक, कादर झेंडा, राम मंदिर,अय्यवस्ताद अखाळा चौक, नेताजी चौक ,मेन रोड ,जुनी ओड,चवडी चोक, डाळ ओळीं, नेहरू मंच मोंडा ,हैदरी चौक ,मोटर स्टँड चौक ,जयस्तंभ चौक ,गवळीपुरा, लकडगंज, जय भीम चौक मार्गे नगर भ्रमण करीत श्री गंज के बालाजी मंदिरात समापन करण्यात आले. शोभायात्रेचे ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत करून प्रसादाचे वितरण केले. शोभायात्रे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जुनी कामठी ठाणेदार दीपक भिताडे, नवीन कामठीचे ठाणेदार भरत शिरसागर यांचे मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.