कन्हान :- भारतीय संविधानास ७५ वर्ष पुर्ण झाल्या निमित्त सन २०२४-२५ या अमृतमहोत्सवी वर्षात यशवंत विद्यालय वराडा येथे संविधान दिन साजरा करून संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ “घर घर संविधान” कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
मंगळवार (दि.२६) नोहेंबर २०२४ ला यशवंत विद्यालय वराडा ता. पारशिवनी जि. नागपुर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि भारतीय संविधान पुस्तिकेस शाळेच्या मुख्याध्यापिका के बी निंबाळकर यांच्या अध्यक्षेत जेष्ट शिक्षक आर बी गभणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी संविधान प्रास्तावि केचे वाचन करून दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी आप ण संविधान स्वीकृत करुन दि.२६ जानेवारी १९५० पासुन संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संवि धानाचे महत्व अनेक स्तरांवर असुन भारतीय संविधा नात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे.
संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याने भारतीय राज्यघटने बाबत जागरू कता, तसेच संविधानाची मुल्ये शालेय, महाविद्यालयी न विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्या पर्यंत पोहचावीत यासाठी भारतीय संविधानास ७५ वर्ष पुर्ण झाल्या निमित्त सन २०२४-२५ या अमृत महोत्सव वर्षात संविधान अमृत महोत्सवी “घर घर संविधान ” कार्यक्रमाचा शुभारंभ करून वर्ष भर विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्विते करिता शाळेच्या मुख्या ध्यापिका के बी निंबाळकर, शिक्षिका ए आर शिंगणे, एस पी गावंडे, शिक्षक आर बी गभणे, आर व्ही गणवीर, एस पी कुथे, एम व्ही रहाटे, डी एम पांडे सह विद्यार्थ्यानी सहकार्य केेले.