सफाई कर्मचाऱ्यांना साडी वाटून वाढदिवस साजरा

– मनपा कर्मचाऱ्याचा असाही पुढाकार ; चष्मेही वाटले

नागपूर :- शहराच्या स्वच्छतेसाठी दिवसरात्र काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञतेची भावना जपत नागपूर महानगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याने वाढदिवस साजरा केला. मनपाच्या नेहरूनगर झोन कार्यालयामध्ये कार्यरत कर्मचारी अशोक संतोष मेश्राम यांनी महिला सफाई कर्मचाऱ्यांना साड्या आणि पुरूष कर्मचाऱ्यांना चष्मे वितरीत करून वाढदिवस साजरा केला.

त्यांच्या या अनोख्या पुढाकाराबद्दल मनपाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी देखील त्यांचे कौतुक केले आहे. अशोक मेश्राम यांचा ५ जून रोजी ६०वा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त नेहरूनगर झोनमधील प्रभाग ३१ मधील यशवंतराव चव्हाण वाचनालय येथे छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी देखील मोठ्या संख्येत सहभाग नोंदविला. कार्यक्रमात त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांना साड्या आणि चष्मे वाटप केले.

प्रभाग ३१मध्ये सुपरवायजर म्हणून कार्यरत असाताला आपल्या मनमिळावू स्वभावामुळे सर्वांनी सख्य जपणाऱ्या अशोक मेश्राम यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या पुढाकाराचे कौतुक करण्यासाठी माजी नगरसेवकांनी देखील आवर्जून उपस्थिती दर्शविली होती. माजी उपमहापौर सतीश होले, माजी नगरसेवक रवींद्र (छोटू) भोयर यांच्यासह दिनेश कलोडे, कमलेश खानविलकर, सुनिल काळे, अनील दौंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आस्थाकेंद्रों का अनादर रोकने की अपेक्षा शासकीय अधिकारियों द्वारा बार मालिकों का बचाव; अधिकारियों पर कार्रवाई करें ! - हिन्दू जनजागृति समिति की मांग

Sat Jun 8 , 2024
– 5 वर्ष बाद भी शासनादेश का पालन नहीं; शराब की दुकानों व ‘बार’ को देवता-राष्ट्रपुरुषों के नाम ! अनेक वर्षाें के प्रयासों के उपरांत आस्थाकेंद्रों के प्रति आदर बनाए रखने के लिए महाराष्ट्र सरकार ने शराब की दुकानों एवं बियर बार को दिए देवी-देवताओं, राष्ट्रपुरुषों, संतों, गढ-किलों के नाम बदले जाएं, इस हेतु 4 जून 2019 को आदेश जारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com