इको फ्रेंडली वातावरणात होळी पर्व उत्साहाने साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– होळी चा रंग उधळला मात्र जरा जपूनच

कामठी :- होळीचा दुसरा दिवस हा पाडव्याचा असून होळीच्या या पाडव्याला सकाळपासूनच गुलाल व रंगाची मोठ्या प्रमाणात उधळण होताना दिसली तर बालक मंडळी रंगाच्या रंगात चांगलेच रंगून होते . तर तळीरामासाठी हा दिवस मोठ्या उत्साहाचा व धुमाकूळ चा असल्याने कित्येकच कोंबड्या बकऱ्याची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली तर काहींना या उत्सवाचा आनंद पनीर ची भाजी खाऊनच समाधान मानले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा होळी या पर्वानिमित्त कामठी तालुक्यात विविध संघटनेच्या वतीने वाईटाचा नायनाट करणे या भूमिकेतून सोमवारी सार्वजनिक तसेच खाजगी होळी जाळून होलिकादहन कार्यक्रम साजरा करण्यात आला तर होलिका दहन झाल्यानन्तर वाईटाचा नायनाट केल्याच्या आनंदात मंगळवार ला धुलीवंदनाचा दिवस हा आनंदाचा मौजमस्तीचा असून बुरा ना मानो होली है या म्हणीनुसार एकमेकांना रंग लावीत गुलालाची उधळण करीत धुळीवंदणाचा दिवस हा इकोफ्रेंडली व खेळीमेळीच्या वातावरणात मोठ्या उत्साहाने पार पडला. तसेच नागरिकांनी होळी चा रंग उधळला मात्र तो जरा जपूनच….

होळीचा सन म्हटला की तो आनंदाचा सन असतो सर्वच जण या सणाच्या प्रतीक्षेत असतात तर काही ठिकाणी धुळवडीच्या दिवशी मारामाऱ्या, भांडणे होत असल्याने या सनाला गालबोट लागीत असतात तर होळीच्या दुसरा दिवस धुळीवंदनाचा दिवस हा पोलिसांच्या खऱ्या परीक्षेचा दिवस असतो त्यामुळे स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन च्या वतीने स्थानिक पोलीस अधिकारी कर्मचारी सह अतिरिक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा ठिकठिकानी पोलीस बंदोबस्त लावून विशेष लक्ष केंद्रित करीत खबरदारी घेतली गेली तसेच वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने खबरदारी घेत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते परिणामी हा पर्व मोठ्या उत्साहाने पार पडले.

या रंगोत्सवाच्या यशस्वीतेसाठी डीसीपी श्रवण दत्त व एसीपी नरवाडे यांच्या मार्गदर्शनार्थ नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत क्षीरसागर व जुनी कामठी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दीपक भिताडे तसेच वाहतूक पोलीस निरीक्षक गोसावी यांच्या नेतृत्वात संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाची कर्तव्यदक्ष भूमिका साकारली.

– काल 7 मार्च हिंदू समाजबांधवांचा धुळीवंदनाचा पर्व तसेच मुस्लिम समाजबांधवांचा शब ए बारात पर्व एकाच दिवशी आल्याने हे दोन्ही पर्व यशस्वीरीत्या पार पडावे यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित करून ठेवले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

CAIT WELCOME DPIIT STEP FOR NATIONAL RETAIL TRADE POLICY

Wed Mar 8 , 2023
Nagpur :- The initiative by the DPIIT to roll out National Retail Trade Policy is a welcome step and will certainly boost the retail trade of India to a next level. It meets with the long pending demand of the Confederation of All India Traders (CAIT) and hence we appreciate this move-said CAIT National President  B.C.Bhartia & Secretary General Praveen […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!