संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 24:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी नागपूर महामार्गावरील भाटिया लॉन येथे आयोजित भाचीच्या लग्न समारंभात सहभागी झालेंल्या फिर्यादी महिलेची नजर चुकवून कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी महिलेच्या सोनेरी रंगाच्या पर्समधून सोन्याचे व आर्टिफिशियल दागिने व एप्पल कंपनीचा एअर पॉड,डेबिट कार्ड व नगदी 10 हजार रुपये असा एकूण 1 लक्ष चार हजार रुपयांचा […]

नागपूर: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव आणि सनदी अधिकारी श्रीकर परदेशी यांनी आज मेट्रो भवन ला भेट दिली. नागपूरला राज्य विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असून त्या निमित्ताने विविध अधिकारी शहरात दखल झाले आहेत. कालच राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (मुख्यमंत्री सचिवालय व नगरविकास विभाग-१) भूषण गगराणी यांनी झिरो माईल फ्रिडम पार्क – एयरपोर्ट साऊथ – सीताबर्डी इंटरचेंज दरम्यान मेट्रोने […]

मुंबई :-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेमळ, संयमी, क्षमाशील व धीरोदात्त जीवनाचे स्मरण देतो. हा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान व संपन्नता घेवून येवो, या सदिच्छेसह सर्वांना नाताळ तसेच नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो,” असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

नागपूर, दि. 24 : जी – 20 परिषदेनिमित्त दि.21 व 22 मार्च 2023 रोजी विविध देशातील मान्यवर नागपूरमध्ये येणार आहेत. त्यामुळे येथील कला, संस्कृती, पायाभूत सुविधा, प्राचिन व प्रेक्षणीय स्थळांचे ब्रँडींग जागतिक दर्जाचे करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.          उपमुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘देवगीरी’ येथे जी-20 परिषदेच्या आयोजनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला […]

नागपूर, दि. 24 : इंडियन सायन्स काँग्रेसचे आयोजन नागपूर येथे दि. 3 ते 7 जानेवारी दरम्यान होत आहे. या आयोजनात महाराष्ट्राची विज्ञान व तंत्रज्ञानातील भरारी प्रतिबिंबीत व्हावी. शाळा, महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी- विद्यार्थीनी यात सहभागी होतील अशी उपाययोजना करावी,अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिल्या.           उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी 108 व्या इंडियन सायन्स […]

नागपूर : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ग्राहकहित जोपासण्याला राज्य शासनाचे प्राधान्य असून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात राज्य शासनाने कठोर भूमिका घेतली असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, ग्राहक हाच कोणत्याही बाजारपेठेचा कणा असतो, त्याचे हित हेच सर्वतोपरी असते. ग्राहकांच्या संरक्षणासाठी राज्य शासनासोबतच या क्षेत्रात कार्यरत सर्व […]

मुंबई : किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत २१ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘औषधी द्रव्ये व औषध बनविणारा उद्योग’ व ‘अभियांत्रिकी उद्योग’ या उद्योगांच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने अधिसूचनेतील तरतुदीनुसार २१ नोव्हेंबर २०२२ ते 31 डिसेंबर २०२२ या कालावधीकरिता तसेच २३ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायवादीच्या आस्थापनातील अधिवक्ते किंवा न्यायवादी यांचा अधिसंघ संस्था व विधी व्यवसायाच्या संबंधित आस्थापनेतील […]

मुंबई :- अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागरूकता, प्रशिक्षण आणि चाचणी या तिन्ही बाबींचा अवलंब करावा अशा सूचना नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्‍णन यांनी दिल्या. गोपाल कृष्णन यांनी प्राधिकरणाचे संचालक गुणवत्ता हमी तपासणारे अधिकारी  हरींदर ओबेरॉय, संचालक पश्चिम विभाग प्रीती चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी यांनी आज वांद्रे कुर्ला संकुलातील अन्न […]

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक कुमार सोहनी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून सोमवार दिनांक 26, मंगळवार दिनांक 27 व बुधवार दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. नॅशनल […]

नागपूर : राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय वसतिगृहातील मुलामुलींना ७ कोटी ५९ लाख रुपये निर्वाह भत्ता देण्यात आला आहे. उर्वरित निर्वाह भत्ता वाटपासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून लवकरच विद्यार्थ्यांना देण्यात येईल, अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य डॉ.मनिषा कायंदे यांनी शासकीय वसतिगृहातील समस्यांबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देतांना मंत्री राठोड बोलत होते. मंत्री […]

नागपूर : कोरोना काळात गरिबांची आर्थिक स्थिती खालावली होती. दिवाळीमध्ये त्यांच्यावर आर्थिक बोजा पडू नये म्हणून राज्य शासनाने प्राधान्य कुटुंब, अंत्योदय अन्न योजना आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात आनंदाचा शिधा 100 रुपयात देण्याचा निर्णय घेतला. राज्यात आनंदाचा शिध्याचा 97 टक्के शिधापत्रिकाधारकांनी लाभ घेतला असून ही सर्व प्रक्रिया ई-लिलावाद्वारे झाल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांची विधानपरिषदेत दिली. विरोधी […]

• चव्हाण यांनी तिकीट घेत मेट्रोने केला प्रवास • नागपूर आंतरराष्ट्रीय शहराच्या दिशेने :  पृथ्वीराज चव्हाण नागपूर : पूर्व मुख्यमंत्री व विधानसभा सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी आज नागपूर मेट्रो प्रकल्पाला भेट दिली. चव्हाण यांनी सिताबर्डी इंटरचेंज ते शंकर नगर मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रोने प्रवास केला. सर्वप्रथम त्यांनी महा मेट्रोच्या मेट्रो भवनला भेट दिली. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित […]

– कन्हान-पिपरी नगरपरिषद कार्यालय समोर २२ डिसेंबर पासुन साखळी उपोषण सुरू.  कन्हान :- शहरातील राष्ट्रीय महामार्गा वरील हिंदुस्तान लिव्हर कंपनीची जमीन विक्री झाल्याने कन्हान शहराच्या विकासावर आणि मुलभुत सुविधा पुर्ण करण्यावर प्रश्न निर्माण झाल्याने ही जागा शासनाने कन्हान शहराच्या मुलभुत गरजा पुर्ण करण्यास खरेदी करावी यास्त व सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व कन्हान-कांद्री दुकानदार महासंघच्या वतीने गुरूवार (दि.२२) डिसेंबर कन्हान-पिपरी […]

गडचिरोली : जिल्हयात वाढते हिवतापाचे प्रमाण लक्षात घेता शासानाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार दिनांक १ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीमध्ये मिशन मलेरिया मोहिम राबविण्यात आली. भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम कवंडे, नेलगुन्डा, मेडदापल्ली या गावात हिवतापाचे प्रमाण अधिक असल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे यांनी भेट दिली. यावेळी तेथील रुग्णांची आरोग्य तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. तसचे गावातील लोकांना हिवतापापासून कसे सुरक्षित राहता […]

– गोंडवाना विद्यापीठाच्या विविध प्रश्नांचा आढावा नागपूर :- गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात आदिवासी भागातील मुलामुलींना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. विद्यापीठाने कौशल्यविषयक अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. अशा सूचना राज्यपाल तथा गोंडवाना विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी दिल्या. आज राजभवनातील सभागृहात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या प्रश्नाबाबत आयोजित आढावा सभेत कोश्यारी बोलत होते. यावेळी वनमंत्री सुधीर […]

अमरावती :-  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था अध्ययन व नियमन केंद्राच्यावतीने 28 डिसेंबर, 2022 रोजी दुपारी 3.30 वा. विद्यापीठातील अधिसभागृह येथे शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर प्रमुख वक्ते म्हणून व्याख्यान देणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. कुलगुरू […]

अमरावती :-  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्यूत्तर गणित विभागात राष्ट्रीय गणित दिवस नुकताच साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एस.व्ही. डुडुल, तर प्रमुख वक्ते म्हणून श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचे गणित विभागप्रमुख डॉ.व्ही.ए. ठाकरे व विद्यापीठ गणित विभागप्रमुख डॉ.एस.एस. शेरेकर उपस्थित होते.                 प्रमुख वक्ते डॉ.व्ही.ए. ठाकरे यांनी ‘पॉप्युलर […]

नागपूर : सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधीत शेतकऱ्यांनी आपले आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक तत्काळ संबंधित साझ्याच्या तलाठी यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधीत झालेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या मदतीचे वाटप पारदर्शकरित्या आणि जलद व्हावे. यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या […]

नागपूर :- राज्यातील सर्व सामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावरील असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, मंत्रालय, मुंबई येथे स्विकारून त्यावर कार्यवाही करण्याकरीता संबंधित क्षेत्रीय स्तरावरील शासकीय यंत्रणेकडे उचीत कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात. मात्र यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याकरीता विभागीयस्तरावर मुख्यमंत्री सचिवालयाची स्थापना करण्यात आलेली असून सदर कक्षामार्फत सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली […]

नागपूर : मतदारांनी व विशेष म्हणजे नवमतदारांनी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपले आधार जोडणी करावीच त्यासोबतच आपल्या परिसरात राहणाऱ्या कमीतकमी 20 मतदारांचे आपल्या मोबाईलव्दारे आधार जोडणी करावी जेणे करुन नागपूर जिल्हयातील सर्व मतदारांचे आधार जोडणी करुन लोकशाही प्रक्रीयेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोग यांचेकडून प्राप्त निर्देशानूसार 1 ऑगस्ट 2022 […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com