नागपूर:-आज दिनांक २४/१२/२०२२ रोजी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतराष्ट्रीय प्राणिसंग्रहाळयातील ’ली’ वाघिणीला सकाळी ८.०० वा. सुमारास प्रसव वेदना सुरू झाल्या. यापुर्वी ’ली’ वाघिणीचा प्रसवानंतर लगेच शावकांना तोंडात दाबून मारण्याचा इतिहास लक्षात घेता पिल्लांना तातडीने वेगळे करुन पिल्लांच्या कृत्रिम संगोपनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी ८.२५ मि. सुमारास वाघिणीने पहिल्या पिलाला जन्म देण्य़ास सुरवात केली. सदर पिल्लू अर्धे बाहेर आले असताना […]

अमरावती :- धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळू नये, धनगर समाज आर्थिक दृष्ट्या सबळ असून ते जमीनदार आहेत त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण देऊ नये अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांनी काल परवा लोकसभेत केली. खासदार राजेंद्र गावित यांचा धनगर समाजातर्फे सर्वत्र निषेध होत असून मुख्यमंत्री शिंदे यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेले असताना त्यांचाच खासदार लोकसभेत […]

पारशिवनी :- पारशिवनी तालुकातिल आमगाव बाबुलवाडा ग्राम पंचायत हद्दीतिल बाबुलवाडा गाव येथिल जिल्हा परिषद.प्राथमिक शाळा बाबुळवाडा येथे परमपुज्य साने गुरुजी उर्फ पांडुरंग सदाशिव साने यांची जयंती चे कार्यक्रम शाळेतिल सभागृहात मुख्याध्यापक उमाकांत बांगडकर यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाला. सहाय्यक शिक्षिका सारिका भोयर यांनी साने गुरुजी लिखीत गीत गायन केले,कार्यक्रमाचे संचालन केले उमाकांत बांगडकर यांनी आपल्या भाषनातून साने गुरुजी यांचे शैक्षणिक […]

नागपुर :-कृषीक्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्र यांना विकासाचा केंद्रबिंदु मानून संशोधन आणि शैक्षणिक संस्थांनी तंत्रज्ञानाला महत्व द्यावे. ग्रीन हायड्रोजन इथेनॉल फ्लेक्स इंजिन यासारख्या नवीन संशोधनावर व्हीएनआयटीने भर देऊन देशाच्या विकासा सोबत विदर्भाच्या विकासासाठी ही संशोधन करावे असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर यांच्या ६० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित हीरक महोत्सवात दिली. आजही VNIT […]

माजी विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार नागपूर : रासायनिक तंत्रज्ञान क्षेत्रात लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्थेने (एलआयटी) बहुमोल कामगिरी केली आहे. तसेच संशोधन व उत्तम मनुष्यबळ निर्मितीमध्ये अमुल्य योगदान दिले आहे. येत्या काळात देशाला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्यासाठी या संस्थेचा मोलाचा वाटा असेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.          एलआयटी संस्थेच्या जागतिक माजी विद्यार्थी […]

खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा : क्रीडा संघटकांना ध्वज वितरित 56 खेळ, 62 मैदाने, 56 हजार खेळाडू, 1 कोटी 30 लाखांवर रोख पुरस्कार नागपूर : मागील चार वर्षांपासून नागपूर शहरात होत असलेला खासदार क्रीडा महोत्सव व्यापक स्वरूप घेत असल्याचा आनंद आहे. देशासाठी दखलपात्र ठरलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या पाचव्या पर्वात 56 हजार खेळाडू सहभागी होत आहेत. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व […]

मोतीराम रहाटे, प्रतिनिधी  कन्हान (नागपुर) : – श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३२३ वी पुण्यतिथी निमित्य कांद्री येथे कार्यक्रमा सह पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित नवनियुक्त तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष योगेश वाडीभस्मे यांच्या हस्ते श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी कांद्री ग्रा पं माजी सरपंच बलवंत […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 24:-आज ,24 डिसेंबर ला ग्रामपंचायत कवठा अंतर्गत अपनाघर कॉलोनी येथे सरपंच लक्ष्मण सिरसाम यांनी कचरा गाडी शुभारंभ करून 12 तासाच्या आत दिलेले आश्वासन पूर्ण केले. यावेळी वरीष्ठ नागरिकांच्या हस्ते नाली कामाचे भूमिपूजन करण्यात आले . याप्रसंगी लोकचंद खूरपूडे ग्रामपंचायत सदस्य, जाहीद खान, महेश महाजन, जगदीश गजभिये, शेंडे , योगिराज गणवीर, गायकवाडताई , मनोज […]

Ø उपमुख्यमंत्र्यांनी दिली पद व गोपनीयतेची शपथ नागपूर, दि. 24 : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी डॉ. संजय अंबादास चहांदे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय निवासस्थान देवगीरी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चहांदे यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधीस उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, अतिरिक्त मुख्य सचिव (जलसंपदा) दीपक कपूर, नितीन करीर, राजेश कुमार, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन […]

अमरावती :-   मध्यप्रदेश राज्याचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांचा यांचा अमरावती भेट प्रसंगी शासकीय विश्रामगृहात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने प्रभारी कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकरी डॉ. विलास नांदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अमरावती :- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांचा अमरावती भेट प्रसंगी शासकीय विश्रामगृह येथे त्यांचा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे व कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन विद्यापीठाचे वतीने सत्कार केला. यावेळी राजभवनाचे प्रधानसचिव संतोषकुमार, विशेष सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी राकेश नैथानी, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, […]

मुंबई (Mumbai) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहर आणि परिसराची वाहतूक वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) (MMRDA) विविध टेंडर बुधवारी प्रसिद्ध केली आहेत. याअंतर्गत वसई खाडीवर तीन नव्या पुलांची उभारणी, शिळफाटा-माणकोली, कल्याण आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील खाडीवरील पुलाचे रुंदीकरण ही कामे करण्यात येणार आहेत. या सर्व प्रकल्पांसाठी सुमारे २ हजार ७६३ कोटींचा खर्च […]

नागपूर (Nagpur) : रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पदपथ, रस्ते, उड्डाणपूल यांचे सुशोभीकरण आणि आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण या सर्व कामांमुळे मुंबई बदलत आहे. मुंबईकरांच्या कल्याणासाठी आगामी काळात अशाच गतिमानपणे मुंबईचा कायापालट करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. मुंबईच्या मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील मुंबई महापालिका सुधारणा विधेयक सभागृहात मांडण्यात आले. त्यावर झालेल्या चर्चेला उत्तर […]

नागपूर (Nagpur) : महावितरण कंपनीमध्ये वर्ग-३ व वर्ग-४ संवर्गातील तांत्रिक व अतांत्रिक कामगारांची जवळपास २६,६४८ पदे रिक्त आहेत. कंत्राटी कामगारांना सेवेत थेट घेता येत नसल्याने भरती प्रक्रियेत कंत्राटी कामगारांना प्रत्येक वर्षी अधिकचे गुण देऊन प्राधान्य देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. तसेच वीज मंडळाचे कोणत्याही स्थितीत खाजगीकरण करण्याचा सरकारचा विचार नाही, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस […]

नागपूर:गंगाबाग पारडी येथील दरगाहच्या जवळ “रोहोबोथ रिव्हायवल मिनिस्ट्री चॅरिटेबल ट्रस्ट” ही सातत्याने गरीब लोकांसाठी मदत करते, सामाजिक सेवा केले जाते, म्हणूनच यावर्षी थंडी बघताच आयोजकांनी गोर गरिबांना ब्लॅंकेट्सचे वितरण करण्यात आले. यापूर्वी ही या ट्रस्टने अनेकदा खूप कार्यक्रम घेतलेले होते. दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर आणि गोरगरिबांना मदत करणे, शाळेतील मतिमंद मुलांना देखील पुस्तक वितरण करणे हे सुद्धा या संस्थेने […]

– कॅमेऱ्यात T – 65 वाघीनी च्या तोंडात दिसले शावक रामटेक – पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर मधील देवलापर वन परिक्षेत्रात बांद्रा खुर्सापार रस्त्यावर T-65 या वाघिणीने काल संध्याकाळी एक बछडा (अंदाजे वय १ महिना) शेपटीच्या बाजूने उचलून नेल्याचे वन रक्षक चेतन उमाठे यांनी सांगितले. नमूद घटनेनुसार सदर बछडा मृत असण्याची शक्यता होती. आज सकाळी सदर क्षेत्रात गस्त करण्यात आली असता […]

मनपा आयुक्तांचे निर्देश : संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा नागपूर : केंद्र शासनाकडून जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशानुसार आंतरराष्ट्रीय विमानाने नागपूर शहरात विदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. केंद्राच्या निर्देशानुसार उद्या शनिवार २४ डिसेंबरपासून शहरात दाखल होणाऱ्या २ टक्के प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले. कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या अनुषंगाने केंद्र […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 24:-स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी कळमना मार्गावरील एका चहा टपरीवर थांबुन डोनट नावाच्या वस्तूमध्ये गुंगीचे औषध घालून त्याच्याकडील बॅग ,एक मोबाईल , बॅग मध्ये असलेले महत्वपूर्ण कागदपत्र व नगदी 6 हजार 900 रुपये ,इतर साहित्य असा एकूण 20 हजार 900 रूपयाची लुबाडणूक करून पसार झालेल्या आरोपीचा शोध लावून अटक करण्यात […]

वक्तृत्व स्पर्धा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, युवा वॉरियर शाखेचे उद्घाटन यासह यंग इंडिया रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन – भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांची माहिती नागपूर :-भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने २५ डिसेंबर ते १२ जानेवारीपर्यंत भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिना पासून ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती – १२ जानेवारी अर्थात राष्ट्रीय युवा […]

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.23) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 2 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com