मुंबई, दि. 23 : पर्यटकांना एमटीडीसीमार्फत लोकप्रिय पर्यटनस्थळांची माहिती व  नाविण्यपूर्ण अनुभव, उपक्रमांची माहिती तसेच सवलती संदर्भात माहिती देणारे दालन पर्यटनवृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.             मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात उभारण्यात आलेल्या दालनास राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. राज्यातील लोकप्रिय ठिकाणी असलेल्या पर्यटक निवासांची माहिती ज्यामध्ये महाराष्ट्रातील समुद्रकिनारे, वने, साहसी पर्यटन, गडकिल्ले, थंड हवेची ठिकाणे, जल पर्यटन आदींचा […]

मुंबई, दि. २३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ या कार्यक्रमात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर‘ या अॅपवर शुक्रवार दि. २४ आणि शनिवार दि. २५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे. महिला […]

 मुंबई, दि. 23 : मुंबईच्या महापौरांविरूद्ध आक्षेपार्ह विधान तसेच त्यांना आलेल्या पत्रामधून त्यांना आणि कुटुंबियांना दिलेल्या धमकीबाबत चौकशी सुरू असून लवकरात लवकर तपास पूर्ण केला जाईल. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाचे संरक्षण ही शासनाची जबाबदारी असून जेथे जेथे अशा घटना घडतील, तेथे गुन्हा करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत सदस्य सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात […]

मुंबई, दि. 23 : राज्यात विविध इमारती आणि रूग्णालयांमध्ये आग लागून दुर्घटना होण्याचे प्रकार दुदैवी असून सर्व रूग्णालयांना फायर, इलेक्ट्रीकल, स्ट्रक्चरल आणि ऑक्सीजन ऑडीट करणे बंधनकारक असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सदस्य अमित साटम यांनी यासबंधी मांडलेल्या लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.             लेखी उत्तरात श्री.शिंदे म्हणाले, मुंबई शहरामध्ये अनेक उत्तुंग इमारती असून, अशा इमारती बांधण्यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी देताना अग्निशमन विभागामार्फत विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार […]

    मुंबई, दि. 23 : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील महापुरामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत काही प्रकरणात विमा कंपन्या टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी लक्षात घेता विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत सांगितले.               विधानपरिषद सदस्य अनिकेत तटकरे यांनी महाड शहरातील व्यापाऱ्यांना महापुरामुळे झालेल्या नुकसान भरपाई देण्याबाबत विमा कंपन्याकडून […]

-स्वातंत्र्याचा अमृत महोतसव अंतर्गत ‘वेब संवाद’ उपक्रम -जिल्हा माहिती कार्यालय, महा-आयटीकडून आयोजन             नागपूर,दि.23  : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात देशात आमूलाग्र बदल झाला आहे. समतेचे कल्याणकारी राज्य प्रस्थापित होण्यासाठी नागरिकांनी अधिकाराच्या जागरुकतेबरोबरच कर्तव्याच्या कक्षा रुंदावल्या पाहिजे तरच समताधिष्ठित व्यवस्था स्थापन होईल, असे मार्मिक मार्गदर्शन ज्येष्ठ साहित्यिक, कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी केले. अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय निर्मित ‘वेबचर्चा संवाद’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांची  ‘स्वातंत्र्योत्तर भारत आणि सामाजिक […]

–  खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा सातवा दिवस  नागपूर, 23 डिसेंबर – वेदपुराण, साहित्‍य, कला, संस्‍कृती, शौर्यगाथा यांचा देदिप्‍यमान इतिहास असलेल्‍या भारत देशावर अनेक आक्रमणे झाली. देशाला स्‍वातंत्र्य मिळवून देण्‍यासाठी अनेकांनी आपल्‍या प्राणांची आहुती दिली. स्‍वातंत्र्यानंतर विश्‍वसत्‍तेच्‍या वाटेवर वेगाने निघालेल्‍या भारत देशाचा या अभ‍िमानास्‍पद कामगिरीचा इतिहास दिव्‍यांग कलाकारांनी ”संस्कृती उत्‍सवा”मध्‍ये सादर करून नागपूरकरांना अचंबित केले. व्हिलचेअरवरील कलाकारांनी आकर्षक नृत्‍य सादर केले, कर्णबधिर […]

नागपूर रेल्वे मेट्रो स्टेशन व नागपूर रेल्वे स्टेशन राहणार संलग्न  खापरी,अजनी रेल्वे स्टेशन नंतर आता नागपूर रेल्वे स्टेशन देखील संलग्न झाले मेट्रो सोबत नागपूर  : नुकतेच रिच २ ( सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन ते वैष्णो देवी चौक मेट्रो स्टेशन) दरम्यान महा मेट्रोने यशस्वीरीत्या प्रथम टेस्ट रन पूर्ण केली असून या मार्गिकेवर लवकरच मेट्रो सेवा सुरु करण्याच्या उद्देशाने इतर अनेक निर्माण […]

नागपूर   : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. महाडिबीटी संगणकीय प्रणालीत चालु शैक्षणिक सत्रासाठी नवीन अर्ज व नुतनीकरणाचे अर्ज 14 डिसेंबर पासून ऑनलाईन प्रक्रिया सुरु झालेली आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी या प्रक्रियेस 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय याची नोंद घ्यावी, असे समाज कल्याण सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे. या […]

नागपूर  : देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमित्त जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयामार्फत तयार होणाऱ्या संकलित साहित्य कृतीला माहिती पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सव अभियानांतर्गत, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सैनिकांच्या सन्मानार्थ ‘ नागपूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सेनानींचे स्वातंत्र्य संग्रामातील सहभाग’ याचे दस्ताऐवजीकरण आणि साहित्य निर्मितीचे योजिले आहे. यासाठी विदर्भातल्या सर्व जिल्ह्यातील स्वातंत्र सैनिक व त्यांच्या नातेवाईकांना […]

नागपूर : मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या तृतीय व चतुर्थ वर्गातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी पेंशन अदालत जिल्हा परिषदेतील कै. आबासाहेब खेडकर सभागृह येथे 28 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सेवाविषयक लाभाबाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी तक्रारीसह कै. आबासाहेब खेडकर सभागृहात उपस्थित आहेत. टोकन […]

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचेसमवेत चर्चा करणार  मुंबई : धान खरेदीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांना अभिकर्ता संस्था म्हणून नेमणूक करण्यात आलेली असून ही खरेदी केंद्रे सुरु होण्यास काही अडचणी येत आहेत. त्यामुळे या अडचणी सोडविण्यासाठी अधिवेशन संपण्यापूर्वी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेण्यात येईल असे आदिवासी विकास मंत्री […]

  मुंबई : दिवंगत वि.प.स., शरद नामदेव रणपिसे, माजी वि.प.स. व माजी मंत्री मखराम बंडुजी पवार, माजी वि.प.स. प्रभाकर यशवंत दातार, माजी वि.प.स. सुरेश मोरेश्वर भालेराव, यांच्या दुःखद निधनाबद्दल विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  शोक प्रस्ताव मांडला.             सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिवंगत शरद रणपिसे यांच्या आठवणीला उजाळा दिला. ते म्हणाले, शरद रणपिसे हे सुरुवातीला पर्वती मतदार संघातून निवडून आले होते. डाव्या विचारसरणीचा […]

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने होणाऱ्या सर्व क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांना क्रीडा विशेष समितीची परवानगी आवश्यक आहे, असा ठराव बुधवारी (ता.२२) क्रीडा विशेष समिती सभापती प्रमोद तभाने यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत पारित करण्यात आला. यावेळी क्रीडा विशेष समिती सभापती प्रमोद तभाने यांच्यासह उपसभापती लखन येरवार, सदस्य प्रमोद कौरती, शेषराव गोतमारे, अमर बागडे, उपायुक्त विजय देशमुख, लिपिक जितेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. […]

जिल्हा उद्योग मित्र समितीचा आढावा उद्योग क्षेत्रास सर्व सुविधा द्याव्यात नागपूर: जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत  विविध भागात उद्योग समुह विकसीत झाले आहेत. शहरालगतच्या बुटीबोरी, हिंगणा, वाडी  आदी औद्योगिक क्षेत्रात असलेल्या उद्योग समुहाला महामंडळाने सर्वसोयीसुविधा पुरवाव्यात व शहराचे  मानांकन वाढवावे. या उद्योगामुळे कोविडमुळे रोजगारापासून वंचित झालेल्या बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळेल. उद्योग समुहाने स्थानिकांना प्राधान्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना […]

-जिल्हाधिकारी संदीप कदम यांचे निर्देश 24 ते 31 डिसेंबर दरम्यान विशेष लसीकरण मोहीम लस न घेणाऱ्या नागरिकांना करणार फोनद्वारे समुपदेशन भंडारा, दि. 21 : लसीकरणाचे अपेक्षित उद्दिष्ट अद्यापही साध्य न झाल्याने विशेष मोहिमेद्वारे जिल्ह्यातील उर्वरीत लसीकरणाला चालना देण्यात येणार आहे. त्यासाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात यावे व ज्या नागरिकांचा अद्यापही दुसरा डोस प्रलंबित आहे. त्या नागरिकांना फोनद्वारे लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी […]

चंद्रपूर : शहरातील माता देवी महाकालीच्या मंदिरात मार्गशीष महिन्यानिमित्त मराठवाडा, आंध्र प्रदेश व तेलंगणा येथून भाविकांची गर्दी होत आहे. भाविक भक्तांना नदीच्या पात्रात पवित्र स्नान करता यावे, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून झरपट नदीच्या पात्राची स्वच्छता करण्यात आली. चंद्रपूरची महाकाली देवी विदर्भासह मराठवाडा आणि आंध्र प्रदेशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे भक्तगण चंद्रपूर शहरात वर्षभर येत असतात. सध्या मार्गशीष महिन्यानिमित्त देवीच्या दर्शनासाठी मराठवाडा, तेलंगणा […]

गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना अनोखी श्रद्धांजली : देशात पहिल्यांदाच सामुहिक पाढे वाचन कार्यक्रम नागपूर : थोर गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना नागपुरातील विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली. नागपूर शहरातील चिटणीस पार्क येथे एकाचवेळी सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी ‘बे एके बे’चे सामुहिक पाढे वाचन करीत देशभक्तीच्या संदेशासह गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना वंदन केले. विशेष म्हणजे, नागपूर शहरात आयोजित हा अनोखा उपक्रम चर्चेचा विषय ठरलेला असून […]

३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.२२) प्लास्टिक पतंग विरोधात शहरातील ४८ पतंग दुकानाची तपासणी केली. याशिवाय उपद्रव शोध पथकाने ३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने शहरातील ३२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली […]

चंद्रपूर, ता. २२ : चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या दोन नागरिकांविरोधात महानगरपालिकेच्या पथकाने चारशे रुपयांचा दंड आकारला. तसेच मा. मुख्य न्याय दंडाधिकारी एस. एम. काळे यांनी थुंकणाऱ्या नागरिकांना दोन तासांसाठी कोठडीत ठेवण्याची शिक्षा सुनावली. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. असे असतानाही अनेक जण सार्वजनिक ठिकाणी थुंकतात. अशांवर निर्बंध घालण्यासाठी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com