नागपूर :- मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सुयोग पत्रकार सहनिवास येथे सदिच्छा भेट दिली व पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. शिबिरप्रमुख प्रवीण पुरो, सहशिबिरप्रमुख तथा मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी मंत्री पाटील यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजना, शिक्षण शुल्क सवलत, विद्यार्थिनींसाठीच्या योजना, केंद्र व राज्य शासनाकडून शिक्षण क्षेत्रात राबविण्यात येणारे अनेक उपक्रम आदी बाबींची माहिती पाटील यांनी […]
Marathi News
काटोल/कोंढाली :- नुकतीच रेल्वे सल्लागार समितीची बैठक रेल्वे स्टेशन काटोल येथे संपन्न झाली. मागील बैठकीमध्ये केलेल्या सूचनाप्रमाणे काही रेल्वेचे थांबे पूर्ववत झालेले आहे तसेच प्रवासी यांना सोयी करिता 3 लिफ्ट चे काम प्रगती पथावर आहेत.दक्षिण गाडी थांबावी याची आग्रही भूमिका मांडण्यात आली व दिलेल्या प्रस्तावा प्रमाणे दक्षिण गाडी थांबली नाही यावर समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त करण्यात आली.बैठकीत रेल्वे स्थानकाचे सांगितल्या […]
नागपूर :- शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्याची योजना पुढील पाच वर्षे चालू ठेवण्याचा सरकारचा निर्धार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासोबतच त्यांना मोफत वीज देण्यासाठी होणाऱ्या खर्चाची भरपाई होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. अत्यंत कमी काळात योजनेची अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांनी ऊर्जा विभागाचे अभिनंदन केले. […]
मुंबई :- केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले 20 टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क 20 टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले असल्याने नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा, कांद्याला खर्चावर आधारीत चांगला दर […]
– सभापतीपदी निवडीबद्दल विधानपरिषदेत प्रा. राम शिंदे यांचे अभिनंदन नागपूर :- विधीमंडळाचे वरिष्ठ सभागृह म्हणून विधानपरिषदेला वेगळी परंपरा आहे. या वरिष्ठ सभागृहाच्या माध्यमातून लोककल्याणासाठी योगदान देण्याचा मानस आहे. सभागृह कामकाजाचा प्रत्येक क्षण आणि क्षण लोकहितासाठी खर्ची पडेल असे जबाबदारीपूर्ण वर्तन आपले राहिल, अशी काळजी घेऊया, अशा शब्दांत विधानपरिषदेचे नवनियुक्त सभापती प्रा. राम शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या. विधानपरिषद सदस्य प्रा. […]
नागपूर :- पुणे येथील लोहगाव विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याबाबत शासकीय ठराव विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला. महाराष्ट्र विधानसभा नियम 110 अनुसार लोहगाव विमानतळ, पुणे येथील विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याची शिफारस केंद्र शासनाला करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.
– ‘जीएसटी’ परिषदेच्या माध्यमातून राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देणार; – राज्यातल्या ‘जीएसटी’ कर संकलनात सुसूत्रता आणून पारदर्शकता आणणार – उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई :- आपल्या देशाने ‘एक देश एक कर’ ही संकल्पना स्वीकारली आहे, त्याच माध्यमातून ‘जीएसटी’ करप्रणाली विकसित करण्यात आली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने अनेक सवलती, अनुदानाच्या योजना राबविण्यात येत आहेत. जीवनावश्यक वस्तूंसह कृषीक्षेत्राशी निगडीत खते, […]
अरोली :- सध्या शेतकऱ्यांचे शेतपिक निघायला सुरुवात झाली असून सर्वच शेतमालाला अत्यंत कमी भाव असून रासायनिक खत व मजुरीचे दर दरवर्षी वाढत असताना शेतमालाचे भाव मात्र यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याने शेतमाल पिकवण्यासाठी लावलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतातूर झालेला असून शेतमालाचे भाव वाढविण्याची कळकळीची मागणी खंडाळा (पिपरी ) येथील सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी देवेंद्र कोगे सह मौदा तालुक्यातील गावागावातील […]
अरोली :- संपूर्ण मौदा तालुक्यात नुकत्याच झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमधून उत्कृष्ट चमूंची निवड करून त्यांना तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी आज 19 डिसेंबर गुरुवारला मौदा येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यंदा या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी वाकेश्वर येथील वर्ग एक ते आठ मधील एकूण 101 पटसंख्या असलेल्या शाळेतील फक्त 24 विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय स्पर्धेत नेण्यासाठी शाळेतील […]
अरोली :- सोयाबीनने यंदा शेतकरी व खाद्य तेलाचे ग्राहक अशा दोघांच्याही डोळ्यात पाणी आणले आहे. शासकीय खरेदीत अटींचा भरमार व खुल्या बाजारात पडते दर यामुळे शेतकरी त्रस्त असतांना सोयाबीन तेल वापरणाऱ्या ग्राहकांना तेलाच्या वाढीव दराचा सामना करावा लागत आहे. तेलासह इतरही जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात ठेवून महागाई कमी करून सर्व सामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी खात येतील काँग्रेसच्या प्रमुख महिला […]
– दैनिक भास्कर नागपुरचा 22 वा वर्धापन दिन नागपूर :- भारत देश आणि राज्याच्या प्रगतीबरोबरच दैनिक भास्करने प्रगती साधत पत्रकारिता क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले. या वृत्तपत्राने नागपुरात वेगळे स्थान निर्माण केले असून नागपूरकर वाचकांना हे आपले वृत्तपत्र वाटते, असेही मुख्यमंत्री म्हणाले. येथील सेंटर पॉइंट हॉटेलमध्ये आयोजित दै. भास्कर नागपुरच्या 22व्या वर्धापन दिनाचे […]
– सर्वेश्वर दास अखिल भारतीय हॉकी प्रतियोगिता आयोजित कराने के लिए किए जाएंगे पत्राचार । – इस वर्ष जिले के 38 खिलाड़ियों ने राष्ट्रीय चैंपियनशिप में भाग लिया। राजनांदगांव :- दिनांक 19 दिसम्बर 2024 दिन गुरुवार को दोपहर 12 बजे “छत्तीसगढ़ हॉकी” कार्यालय म्युनिसिपल स्कूल परिसर जी ई रोड में जिला हाॅकी संघ राजनांदगांव की आवश्यक बैठक संघ के अध्यक्ष […]
– लाडक्या बहिणींचा देय हप्ता अधिवेशनानंतर जमा होणार, शेतकऱ्यांना वीज बील नाही नागपूर :- राज्यातील शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकाला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरु असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिला. राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा देय हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल, अशी ग्वाही देत महाराष्ट्र कालही […]
Ø जीएसटीच्या 54 हजार कोटींच्या विवादित मागण्यांसाठी 1 लाख 14 हजार अर्ज अपेक्षित, Ø राज्य आणि केंद्राच्या तिजोरीत प्रत्येकी अडीच ते तीन हजार कोटींची रक्कम जमा होणार Ø राज्याच्या महसुलवाढीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महत्वाचे पाऊल नागपूर :- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, 2017 विधेयकातील कलम 73 अंतर्गत वर्ष 2017-18, 2018-19 आणि 2019-20 च्या करमागण्यांशी संबंधित व्याज किंवा दंड […]
यवतमाळ :- जिल्ह्याचे पालक सचिव तथा आरोग्य विभागाचे प्रधान सचिव नवीन सोना यांनी शहराजवळ असलेल्या सावरगड प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांच्याहस्ते हँन्डी एक्स-रे मशीनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रल्हाद चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सागर जाधव, तालुका आरोग्य […]
यवतमाळ :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्ती आणि नियुक्ती झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांची नोंदणी करताना तांत्रिक अडचणी येत आहे. अशा शासकीय आस्थापनांनी प्रशिक्षणार्थ्यांची माहिती उद्या दि. 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद, यवतमाळ या कार्यालयकडे आवश्यक कागदपत्रांसह सादर करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त प.भ.जाधव यांनी केले आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता […]
यवतमाळ :- ज्या विद्यार्थ्यांनी कंबाईन्ड डिफेन्स सव्हींसेस या परीक्षेकरीता अर्ज केलेला आहे. अशा विद्यार्थ्यांकडून सीडीएस या परीक्षेची पुर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे राज्य शासनातर्फे दि. २० जानेवारीते ४ एप्रिल या कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक ६४ चालविण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थ्यांची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र […]
अरोली :- पं.स.मौदा ,केंद्र अंजनगाव अंतर्गत येत असलेल्या भेंडाळा येथील उच्च प्राथमिक शाळेत केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव 17 डिसेंबर मंगळवारला सकाळी नऊ ते सायंकाळपर्यंत उत्साहात व थाटात पार पडले. आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून सभापती स्वप्नील श्रावणकर अध्यक्ष म्हणून गट ग्रामपंचायत भेंडाळा सरपंचा शिल्पा राजकुमार भोयर, विशेष अतिथी म्हणून जि. प. सदस्य कैलास बरबटे, पंचायत समिती सदस्य […]
यवतमाळ :- आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या युवक, युवतींना आर्थिक साहाय्य पुरविण्याच्यादृष्टीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे कर्ज व्याज परतावा योजना सुरु करण्यात आल्या आहे. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महामंडळाच्या योजनांचा लाभ मराठा समाजातील तरुण, तरुणींना देण्यात येत आहे. महामंडळामार्फत अनेक शेतीपूरक व्यवसाय तसेच सेवा, उत्पादन […]
गडचिरोली :- सध्या तूर पिक हे फुलोऱ्यावर असून बऱ्याच ठिकाणी शेंगा लागून दाणे भरण्यास सुरवात झालेली आहे. मात्र मागील आठवड्यातील असणारे रात्रीचे थंड हवामान तसेच ढगाळ वातावरण तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे व अश्या वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यापासुन नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी बंधूनी आपल्या पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापनाचे उपाय योजना करणे आवश्यक […]