नागपूर :- गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सिमीता लिगल अॅपल आय.एन.सि मोबाईल कंपनी चे लिगल अॅडव्होकेट मृणाल महेशचंद्र अग्रवाल यांनी येवुन माहिती दिली की, पोलीस ठाणे धंतोली हद्दीत धनवटे चेंबर जवळ, एन.जी. एम मोवाईल्स येथे ते प्राधिकृत अधिकारी असलेल्या अॅपल कंपनीचे नावाचे लेबल व लोगो असलेले विवीध बनावट मोवाईलचे एक्सेसीरीज विकी करीता साठवणुक करून ठेवलेला आहे. अशा माहितीवरून पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी फिर्यादीसह नमुद ठिकाणी जावुन पंचासमक्ष रेड कारवाई केली, आरोपी नामे नविन अहमद शकील अहमद याचे ताब्यातुन अॅपल कंपनीचा बनावटीकरण केलेला विवीच उत्पादने एकुण किंमती ५९.९४.०६१/- रू. या साठवणुक करून स्वतःचे आर्थिक फायदासाठी विकी करीता ठेवलेला मिळून आला. आरोपीने अॅपल कंपनीच्या स्वामीत्व हक्काचे उलंघन केल्याने कंपनीचे प्राधीकृत अधिकारी फिर्यादी मृणाल महेशचंद्र अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे धंतोली येथे आरोपीविरुध्द कलम ३४९ भा.न्या.सं. सहकलम ५१, ५३ कॉपी राईट अॅक्ट, सहकलम १०३, १०४ अधिकार अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ब) दिनांक २४.१२.२०२४ चे १८.३० वा. ते २३.५५ वा. चे दरम्यान, गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सिमीता लिगल अॅपल आय. एन. सि मोबाईल कंपनी वे लिगल अॅडव्होकेट मृणाल महेशचंद्र अग्रवाल यांनी येवुन माहिती दिली की, पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत राहुल मार्केट सिताबर्डी येथे ते प्राधिकृत अधिकारी असलेल्या अॅपल कंपनीचे नावाचे लेवल व लोगो असलेले विवीध बनावट मोबाईलने एक्सेसीरीज विकी करीता साठवणुक करून ठेवलेला आहे. अशा माहितीवरून पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी फिर्यादीसह नमुद ठिकाणी जावुन पंचासमक्ष रेड कारवाई केली असता तेथे १) राज मोबाईल्स येथे आरोपी नामे अमीत दिलीपकुमार ईसरानी २) नागनेची टेलिकॉम येथे आरोपी नामे कल्याणसिंग मलसिंग ३) कुमारी बाबू कव्हर ४) दिया मोवाईल्सचे आरोपी नामे प्रज्वल जिवन जरूळकर ५) सुनिल रहेजा ६) श्रीरामदेव मोवाईल अॅक्सेसीरिज चे आरोपी नामे जेपाराम देवाराम चौधरी ७) राजुभाई बौधरी ८) चामुंडा मोबाईल्स चे आरोपी नामे भिमराम विरमाराम चौधरी याचे ताब्यातुन अॅपल कंपनीचा बनावटीकरण केलेले व कंपनीचे नावाचे लेबर व लोगो असलेले विवीध बनावट उत्पादने एकुण किंमती १,५७,१३,५५४/- रू. चा मुद्देमाल साठवणुक करून स्वतःचे आर्थिक फायदासाठी विक्री करीता ठेवलेला मिळून आला. आरोपी यांनी अॅपल कंपनीच्या स्वामीत्व हक्काचे उलंघन केल्याने कंपनीचे प्राधीकृत अधिकारी फिर्यादी मृणाल महेशचंद्र अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सिताबर्डी येथे आरोपीविरूध्द कलम ३४९ भा.न्या.सं., सहकलम ५१, ५३ कॉपी राईट अॅक्ट, सहकलम १०३, १०४ अधिकार अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
वरील दोन्ही कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपुर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपुर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोनि, गजानन गुल्हाने, सपोनि, मनोज घुरडे, पोहवा. विजय यादव, मनोज नेवारे, पवन गजभिये, नापोअं. अरविंद गेडेकर, पोअं. सुभाष गजभिये, रोहीत काळे, सहदेव चिखले, अमन राऊत, राहुल पाटील व मपोहवा, अनुप यादव यांनी केली.