संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करता ना ट्रक्टर ट्रॉली पकडुन तीन लाख तीन हजाराचा मुद्दे माल जप्त करित दोन आरोपी विरूध्द कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार वाई उपविभागिय पोलीस अधिकारी कन्हान पथकानी केली.
सोमवार (दि.३१) मार्च ला संतोष गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान हे त्यांच्या पथकासह कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयांवर कारवाई करण्यास पेट्रोलींग करित असतांना ट्रॅक्टर क्र. एम.एच. ४० बी.जी. २४५६ व त्याची ट्रॉली क्र. एम.एच. ४० एल. ४३९० हे संशयित वाहन मिळुन आले. पोलीसांनी वाहनास थांबवुन वाहनाची पाहणी केली असता वाहनामध्ये रेती सह वाहन चालक अक्षय तिमाजी चांदेवालुके वय २५ वर्षे आणि वाहन मालक राहुल देविदास येरणे वय ३१ वर्षे, दोघेही राह. बोरी (सिंगोरी) ता. पारशिवणी हे मिळुन आले. त्यांचे जवळ कोणताही परवाना नसल्याने पोलीसांनी पंचासमक्ष वाहना मधुन १) ०१ ब्रास रेती किंमत ३,००० रूपये आणि २) ट्रॅक्टर क्र. एम.एच. ४० बी.जी. २४५६ व ट्रॉली क्र. एम.एच. ४० एल. ४३९० किंमत ३,००,००० रू. असा एकुण ३,०३,००० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून वाहन चालक आणि मालक यांच्या विरूध्द पो स्टे कन्हान येथे कलम ३०३(२), ३(५), ४९ भा.न्या.सं, बि.एन.एस. सहकलम ४८ (८), ४८ (७) महा.जमीन महसुल अधिनियम व कलम ४, २१ खान व खनीजे अधिनियम, १९५७. कलम ३ सार्वजनिक संपत्ती नुक सान प्रतिबंधक अधिनियम, १९८४ अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली.