पारशिवनी :- ग्रामीण भागात आरोग्यव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत . अशात बोगस डॉक्टरच रुग्णावर उपचार करीत असल्याचे प्रकार उघडकीस येत असल्याने दुर्गम भागातील नागरिकांनी विश्वास कुणावर ठेवावा , असा प्रश्न निर्माण झाला आहे . पारशिवनीत तीन बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल झाल्याने ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्थेचे वास्तव पुन्हा चव्हाट्यावर आले आहे . बोगस पदवीच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या पारशिवनी तालुक्यातील तीन डॉक्टरांवर महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियमानुसार पारशिवनी पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला . पारशिवनी पोलीसानि तक्रारदार डॉ. प्रशात वाघ तालुका वैधकिय अधिकारी पाराशिवनि यांची तक्रारी वरुन अपराध क्रमाक ३३३/२२ अन्वये कलम ३३(१),३३(२),४२० नुसार दाखल करून पुढील तपास पो. उप. नि ज्ञानबा पळनाते करीत असुन यात तिन सदस्यी समितीला संदर्भानुसार बोगस वैद्यकोष व्यवसायीका वर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याबाबत आदेश समिती चे अध्यक्ष सुभाष जाधव ( गटविकास अधिकारी , पंचायत समिती , पारशिवनी
२. डॉ.प्रशांत वाघ( ता.आ.अ. पारशिवनी )
३ ) ज्ञानेश्वर चोदे ( आ.वि.अ. पंचायत समिती , पारशिवनी यांचे नुसार
उक्त विषयाचे अनुषंगाने पारशिवनी तालुक्यामध्ये ग्राम बिटोली, माहुली, गवना, गरांडा गावा मध्ये गेल्या काही वर्षापासून बोगस डॉक्टरांचे दवाखाने असून सदर बोगस डॉक्टर त्यांचे घरी सुध्दा दवाखाने चालवितात असे चौकशी दरम्याण निदर्शनास आले . बोगस वैद्यकीय व्यवसायिक यांच्याबाबत तक्रारदार जगदेव उरकुंडा शेंडे मनसर यांचे प्राप्त तक्रार च्याअनुषंगाने पारशिवनी तालुक्यात गटविकास अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली सदस्यिय समिती गठीत करुन बोगस वैद्यकीय व्यवसायिक यांची चौकशी करण्यात आली . चौकशी दरम्याण खालील बोगस वैद्यकीय व्यवसायिक यांची माहीती प्राप्त झाली .
१ ) तालुका पारशिवनी अंतर्गत डॉ . राजाराम अनंतराम गौतम , मौजा बखारी येथिल रहिवाशी असून बखारी , गवना गरांडा या गावामध्ये एका ठिकाणी न राहता गावोगावी फिरून व्यवसाय करीत असून रुग्नास अलोपॅथिक औषधी देत असल्याचे आढळून आले . चौकशी दरम्याण प्रमाणपत्राची चौकशी केली असता डॉ . गौतम यांचेकडे राजकिय आयुर्वेदिक एवं युनानी चिकित्सा परिषद , पटना ( बिहार ) येथिल प्रमाणपत्र असून वैद्यकिय व्यवसाय करण्यासबंधित पदवि अधिकृत नसून सदर व्यक्ती बोगस पदविच्या आधारे वैद्यकिय व्यवसाय करीत आहे . असे निदर्शनास आले ..
२ ) डॉ . प्रेमानंद बुधराम पारधे , मौजा बिटोली येथे खाजगी वैद्यकिय व्यवसाय करीत असून त्यांचे प्रमाणपत्राची तपासणी केली असता . EMPC OF INDIA चे प्रमाणपत्र असून राष्ट्रीय मुक्त विद्यालयो शिक्षा संस्थान न्यू दिल्ली येथिल व्यवसायिक परिक्षा पास केल्याचे प्रमाणपत्र आढळले . EMPC OF INDIA चे प्रमाणपत्रातिल दिलेल्या नोट नुसार सदर व्यक्ती Electro homoeopathy medicine pratice करु शकतो . अलोपॅथिक चिकित्सा पद्धतिनुसार यांना रुग्नास औषध देता येत नाही . तरी रुग्णाना अलोपॅथिक औषधही देत असताना व पदवी अधिकृत नसताना असल्याचे दरम्याण आढळून आले .
३. डॉ. योगेन्द कुमार चौहान याचे मौज विटोली येथे खाजगी करीत तपासणी केली असता राष्ट्रीय विद्यालय शिक्षा संस्थान भारत सरकारचे HYGIENE AND HEALTH VOCATIONAL EDUCATION INSTITUTE RING ROAD , GONDIA घेवून प्राप्त केल्याचे आढळून आले . तरी सर करण्यास अधिकृत नमून सदर व्यक्ती बोगस पदवीच्या आधारे करीत असल्याचे चौकशीदरम्याण निदर्शनास आले . ४ ) डॉ . नत्थु खेडीकर मौजा माहुली , डॉ. बिसने मोजा माहुली व डॉ . गौतम वाहने मौजा बिटोली यांच्या चौकशी केली असता कोणत्याही प्रकारे वैद्यकीय व्यवसाय करीत नसल्याचे सध्याच निष्पन्न झाले . सदर चौकशी अहवालानुसार राजाराम गौतम डॉ. प्रेमानद पारधे , डॉ. योगेन्द कुमार चौहान यांनी संदर्भ २ नुसार सभेमध्ये वैद्यकीय व्यवसायिक म्हणून महाराष्ट्र व्यवसाय अधिनियम १ ९ ६१ च्या कलम ३३ ( एक ) नुसार वैद्यकीय परीषदेकडे नोंदणी केलेली नसुन हे वैद्यकीय व्यावसायिक बोगस करीत असून ते लोकांची शासनाची अप्रामाणिकपणे करीत असल्यामुळे १ ) डॉ . राजाराम अनंतराम गौतम , बखारी २ ) व प्रेमानंद बुधराम पारधे मौजा बिटोली ३ योगेद्रकुमार बुधनलाल चौहाण , मोजा बिटोली या बोगस वैद्यकीय व्यवसापिका वर पोलिस स्टेशन येथे तालुका वैद्यकीय अधिकारी यांची तक्रारी नुसार अपराध क्रमांक ३३३/२२ नुसार ( महाराष्ट्र व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलम ३३ ( १ ) , ३३ ( २ ) सह भारतीय दंड संहिता चे कलम ४२० अन्वये दाखल करून पुढील तपास पो. उप. नि ज्ञानबा पळनाते करीत आरोपी या शोध घेत आहे .