सहा जुगाऱ्यावर गुन्हा दाखल ,1 लक्ष 1 हजार 295 रुपयांचा मुद्देमाल जप्त

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू येरखेडा येथील पाण्याच्या टंकीखाली अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड घालण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त झाले असून या धाडीतून सहा जुगाऱ्याना ताब्यात घेत त्यांच्याकडून नगदी 16 हजार 20 रुपये, वेगवेगळ्या कंपणीचे 5 महागडे मोबाईल किमती 84 हजार रुपये,52 तास पत्ते किमती 75 रुपये,जागेवरून 1200 रुपये व इतर असा एकूण 1 लक्ष एक हजार 295 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाही मध्यरात्री 2 वाजेदरम्यान केली. तर या सहाही जुगाऱ्यावर भादवी कलम 12 महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा जुगाऱ्यात बादल उर्फ दादू भस्मे वय 32 वर्षे रा तेलिपुरा येरखेडा,शुभम चौधरी वय 21 वर्षे रा ऑरेंज सिटी कामठी, आकाश बाहे वय 28 वर्षे रा तारा माता चौक येरखेडा,सोनू यादव वय 28 वर्षे रा प्रीती ले आउट येरखेडा, मुन्ना यादव वय 28 वर्षे रा यादव नगर, कामठी, राजकुमार दिवटे वय 42 वर्षे रा वार्ड क्र 1 येरखेडा कामठी असे आहे.ही यशस्वी कारवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस उपनिरीक्षक संजय आठवले सह पोलीस पथकाने केले असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

50 विधवा लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत

Fri Sep 22 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-बीपीएलधारक कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्यास शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब प्रमुख अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पीडित विधवांना शासनाकडून 20 हजार रुपयांची अनुदान रक्कम मंजूर केली जाते.मात्र मागील सहा महिन्यांपासून अनुदानाची रक्कम प्राप्त झाली नसल्याने या योजनेतून कामठी तालुक्यातील 50 विधवा महिला लाभार्थी अनुदान रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. मागील काही वर्षांपूर्वी शासनाच्या महसूल प्रशासना अंतर्गत राष्ट्रीय कुटुंब प्रमुख अर्थसहाय्य योजना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com