नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हद्दीत प्लॉट नं. ४०, सद्गुरू नगर, अजनी, नागपुर येथे राहणारे फिर्यादी रामदास बलराम गिद, वय ६३ वर्षे, हे त्यांचे घराला कुलूप लावुन परिवारासह नातेवाईकाचे लग्नाकरीता वरूड, जि. अमरावती येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप व कडी कोंडा तोडुन, घरात प्रवेश करून, वेडरूम मधील आलमारी मध्ये ठवेलेले रोख ८७,०००/- रू. तसेच, सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण १,२७,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे अजनी येथे पोउपनि. सुशांत उपाध्याय यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५, ३३१(३), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.