नागपूर :- पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीत प्लॉट नं. ८६. सुर्वेनगर, नागपूर येथे राहणारे फिर्यादी पुलोक सुनिलकुमार बॅनर्जी, वय ६३ वर्ष, हे बाहेर गेले होते. व त्यांची पत्नी यांनी राहते घराला कुलूप लावुन त्या पुजेसाठी रामकृष्ण मठ, धंतोली येथे गेल्या असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीने घराचे मुख्य दाराचे कडी कोंडा व कुलूप तोडुन, आत प्रवेश करून, बेडरूम मधील लोखंडी आलमारीतील रोख ५०,०००/- रू. व सोन्याचे दागिने असा एकुण १,५८,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे प्रतापनगर येथे सपोनि चरडे यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५, ३३१(३), ३३१ (४) भा. न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.