नागपूर :-फिर्यादी विपीन सुरेश गाडगीलवार, वय ४० वर्षे, रा. प्लॉट नं. २५, सितानगर, भैयालाल वाडी, वर्धा रोड, सोनेगाव, नागपूर यांचा सावकारीचा व्यवसाय असुन त्यांचे पोलीस ठाणे धंतोली हद्दीत १६३, विवेकानंद नगर, वर्धा रोड, नागपूर येथे ऑफीस आहे. त्यांचे ऑफीस मधील कर्मचारी नामे सुनिल मधुकर सहारे वय ४० वर्ष रा. ईसासनी, प्लॉट नं. ३०१, एम.आय.डी.सी., नागपूर हा फिर्यादीने ग्राहकांना दिलेल्या लोनये परतफेडीचे हफ्ते कलेक्शन करून फिर्यादीचे अकाऊंट मध्ये जमा करण्याने काम करतो. दिनांक ०५.०३.२०२४ चे १२.०० वा. ते दिनांक २८.०१. २०२५ चे ११.०० वा. दरम्यान आरोपी क. १) सुनिल मधुकर सहारे याने फिर्यादीचे ग्राहकांकडुन कलेक्शन केलेले पैसे फिर्यादीचे अकाऊंट मध्ये न टाकता आरोपी क. २) राहुल मधुकर सहारे वय ३७ वर्ष ३) मंगेश मधुकर सहारे वय ५२ वर्ष यांचे सोबत संगणमत करून एकुण ७,७८,०००/- रू. त्यांना परस्पर वापरण्याकरीता दिले. फिर्यादीस माहिती झालेवर फिर्यादीने आरोपींना रक्कम परत मागीतली असता आरोपींनी टाळाटाळ करून रक्कम परत न करता फिर्यादीस धमकी दिली. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून ग्राहकांकडून एकूण ७,७८,०००/- रू. पेवुन स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता वापर करून फिर्यादीवा अन्यायाने विश्वासघात करून फसवणुक केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे धंतोली येथे पोउपनि, वाघ यांनी आरोपीविरूध्द कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.