नागपूर :- फिर्यादी किरण सतिष पाटील, वय ३३ वर्षे, रा. चिंतामणी नगर, दाभा, गिट्टीखदान, नागपुर ह्या त्यांचे मैत्रीणीसह पोलीस ठाणे धंतोली हद्दीत मेहता चेंबर, झांशी राणी चौक, धंतोली येथे मोबाईलचे दुकानात मोबाईल खरेदी करीता गेल्या असताना त्यांची ओळख आरोपी क. १) कृष्णा गुप्ता, २) रविना कृष्णा जोतवानी, ३) अमित जैन मोबाईल क. ९८९०६४८६०७ चा धारक सेल्युलार लाईफ स्टाईल, रामदासपेठ, नागपुर यांचेसोबत झाली होती. आरोपींनी संगणमत करून, फिर्यादी यांना एच. डी.एफ.सी. बँकेतुन कर्ज मिळवुन देण्याचे खोटे आमिष दाखविले व फिर्यादीकडुन त्यांची कागदपत्रे घेवुन नमुद कागदपत्राचा गैरवापर करून त्याद्वारे कर्ज व मोबाईल घेवून फिर्यादीस न देता स्वतः चे आर्थिक फायद्याकरीता वापर करून फिर्यादीचा अन्यायाने विश्वासघात करून फसवणुक केली. अशाचप्रकारे आरोपीनी फिर्यादी व ३९ ईतर लोकांची दिनांक २१.०४.२०२३ ते दिनांक २९.११.२०२४ चे दरम्यान,त्यांची कागदपत्रे घेवुन नमुद कागदपत्राचा गैरवापर करून त्याद्वारे वेगवेगळ्या बँकेतून कर्ज व मोबाईल घेवुन स्वतः ये आर्थिक फायद्याकरीता वापर करून फिर्यादी व ईतर ३९ लोकांची अन्यायाने विश्वासघात करून एकुण ५५,००,०००/-रु. ची आर्थिक फसवणुक केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकार व अर्ज चौकशीवरून पोलीस ठाणे धंतोली येथे मपोउपनि, सोनुने यांनी आरोपीविरूध्द कलम ४०६, ४२०, ३४ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.