नागपूर :- पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत राहणाऱ्या २३ वर्षीय महीला फिर्यादी यांना एम.बि.बि.एस. करीता प्रवेश पाहीजे असल्याने, आरोपी क. १) डॉ. अतुल रमेशराव इंगोले, वय ३८ वर्षे, रा. श्रीकृष्ण नगर, हनुमान मंदीर जवळ, बेसा रोड, हुडकेश्वर, नागपुर यांचे रेशीमबाग येथे पिपलिंग प्लेसमेंट प्रायव्हेट लिमीटेड चे कार्यालय असुन, आरोपी क. २) व्यंकट रेड्डी रा. भानु टॉवर, ईएसआय हॉस्पीटल समोर, हैदराबाद है कोलंबस सेंटर युनिव्हर्सिटी बेली अमेरीका येथे सि.ओ. असल्याचे सांगुन, यातील आरोपी क. १ व २ यांनी संगणमत करून, फिर्यादी यांना बेलीज अमेरीका येथे एम.वि.वि.एस. चे शिक्षणाकरीता प्रवेश मिळवुन देण्याचे आमिष देवुन, फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आरोपीतांनी फिर्यादीकडुन २१,३५,०००/-रु. घेवुन फिर्यादीला कोणतेही शिक्षणाकरीता प्रवेश मिळवुन दिला नाही यामुळे फिर्यादीचे ०२ शैक्षणिक वर्षे वाया गेल्याने, फिर्यादी व त्यांचे परीवाराला मानसिक त्रास झाला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकार व अर्ज चौकशीवरून पोलीस ठाणे सक्कस्दरा येथे पोउपनि गंगाधर दहीलकर यांनी आरोपीविरुध्द कलम ४०६, ४२०, ३४ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.