kamptee cantonement

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 
-कामठीत दोन ठिकाणी सीबीआय ची धाड
कामठी ता प्र 19 :- कामठी कॅन्टोन्मेंट हद्दीत येणाऱ्या परिसरात आवश्यक असलेल्या सफाई कर्मचारी (माळी) व नर्सरी टीचर पदासाठी उमेदवार भरती पदासाठी कामठी कॅन्टोन्मेंट विभागाच्या वतीने काही महिन्यांपूर्वी भरती बोलावण्यात आली होती मात्र या भरती प्रकरणात पात्र उमेदवारांना गाठून त्यांच्याशी आर्थिक घेवाण करून लाखो रुपयांची भर्ती घोटाळा केल्याची गुप्त माहिती सीबीआय विभागाला कळताच सीबीआय पथकांनी काल सायंकाळी सहा दरम्यान वेळीच कामठी कॅन्टोन्मेंट कार्यालय व कार्यालयीन कर्मचारीच्या रहिवासी क्षेत्र येरखेड्यात धाड घालण्याची यशस्वी कारवाही केली असून या कारवाहितुन तीन आरोपीना अटक करण्यात आले असून 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटक आरोपी मध्ये कामठी कॅन्टोन्मेंट चे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर लांजेवार,कार्यालयीन कर्मचारी दीप सकतेल तसेच नर्सरी टीचर महिला कर्मचारी आहे.
….पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार मागील काही महिन्यांपूर्वी कामठी कॅन्टोन्मेंट विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या नर्सरी टीचर आणि माळी भर्ती प्रकरणात पात्र उमेदवारांची यादी कार्यालयातून लीक करून पात्र उमेद्वारांशी भेट घालून भर्तीसाठी दोन लक्ष रुपयाची मागणी करण्यात आली त्यानुसार 11 लक्ष 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली असून पहिला हफ्ता म्हणून 2 लक्ष रुपये स्वीकारताच सीबीआय ने धाड घालून कार्यालयिन कर्मचारी दीप सकतेल ला ताब्यात घेत अटक केली.सोबतच या प्रकरणाशी निगडित सर्व दस्तावेज जप्त करून या प्रकरणाशी निगडित अन्य दोन आरोपीनाही ताब्यात घेण्यात आले.तर या प्रकरणात अजून खूप मोठा गौप्यस्फोट होणार असल्याची माहिती असून यात संबंधितावर अटकेची टांगती तलवार आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com