नागपूर :- फिर्यादी शेख अशरफुल नौशाद अली, वय २१ वर्ष, रा. बालाजी कॉम्प्लेक्स, निकालस मंदीर जवळ, तहसिल, नागपूर हे ईरशाद शेख, यांचे सोन्या-चांदीचे दुकानात, सोन्याचे दागिने पॉलीस करण्याचे काम करीत असुन, दिनांक २१.११.२०२४ चे १३.०० वा. ते १३.१५ वा. चे दरम्यान फिर्यादीचे मालकांनी त्यांना अनुप मंडल, ईतवारी नागपूर, यांचे दुकानातुन दागिने आणण्यास सांगीतले, फिर्यादी है अनुप मंडल यांचे दुकानातुन दागिने घेवुन पॅन्टचे खिश्यात ठेवुन पायदळ येत असतांना, पोलीस ठाणे तहसिल हद्दीत नरहरी हॉल माकींग सेंटरचे बाजुला, निकालस मंदीर जवळ, दोन अनोळखी ईसमांनी फिर्यादीस ते सोनार आहेत असे खोटे सांगुन फिर्यादीस विश्वासात घेवुन त्यांची दुकान बाजुलाच आहे असे सांगून दागिने चेक करून देतो असे म्हणुन फिर्यादी जवळुन दागीने घेवुन फिर्यादीची नजर चुकवुन किंमती १३,१३,१०९/- रू. चे दागिने घेवून पळुन गेले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे तहसिल येथे पोउपनि, भोसले यांनी दोन अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३१९(२), ३(५) भाज्या.सं., अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.