संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– इच्छुकांच्या हालचाली संथ निवडणुकीच्या आदेशाची वाट
कामठी ता प्र 29 :- कामठी नगर परिषद निवडणूक लागणार अशा स्थितीतच राज्य सरकारचे सत्तेचे न्यायालयीन घोडे उभे झाल्याने अपेक्षित नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या नगर परिषद निवडणुका लांबणीवर गेल्या .वास्तविकता कामठी नगर परिषद निवडणूक कार्यक्रमाची कार्यलयीन पायरी ही आरक्षण सोडत संपेपर्यन्त पोहोचली आता निवडणूक लागणे अपेक्षित होते मात्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमा नुसार मे महिन्यात निवडणूक होणार असे असतानाच ओबीसी आरक्षणासाठी सरकारने प्रभाग रचनेचे अधिकार आपल्याकडे ठेवण्याचा अध्यादेश काढल्याने आयोगाने काढलेली प्रभागाची पुनर्रचना ही रद्द झाली होती परंतु त्यात सुप्रीम कोर्टाने निवडणूक जाहीर करा अशा सूचना निवडणूक आयोगाला दिल्या होत्या.थंड बसलेल्या इच्छुक उमेदवार एकटिव्ह मोडवर असल्याचे दिसून येत होते .जुलै महिन्यात नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भात आरक्षण , प्रभाग रचना, मतदार यादी सर्व कर्यक्रम पार पडले परंतु राज्याची सत्ता बदल झाल्याने पुन्हा नगराध्यक्ष जनतेतून निवडून देण्याचा अध्यादेश निघाला तसेच 92 नगर परिषदेचा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अधांतरी असल्याने निवडणूक लांबणीवर पडली आहे त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आता थंडावले दिसून येत आहेत.
प्रत्येक जण आपल्या परीने निवडणुक कधी होतील याची चर्चा करताना दिसत आहे .मध्यंतरी च्या काळात नगर पालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना निवडणूक पूर्वतयारी सुरू केली होती .संभाव्य प्रभागात संपर्क यंत्रणा गतिमान केली होती .प्रभागात होणारे विविध कार्यक्रमाला सढळ हाताने आर्थिक मदत देण्यास काहींनी सुरुवात केली होती आता पुन्हा निवडणुका लांबनिवर पडणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी काही काळासाठी विश्रांती घेण्याचे ठरविले असल्याचे दिसून येत आहे.