नवी मुंबई :- टपाल विभागाच्या वाशी नवी मुंबई पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधीक्षक यांनी पोस्टल सेवांबाबतच्या तक्रारी ज्यांचे सहा आठवडयांच्या आत निराकरण झाले नाही त्यांचा चौथ्या डाक अदालतमध्ये दि.27 मार्च, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता विचार केला जाईल असे कळविले आहे.
याबाबत नोंदणी नसलेल्या/ नोंदणीकृत मेल्स, स्पीडपोस्ट, कांऊटर सेवा, बचत बँका आणि मनी ऑर्डर न भरणे इत्यादी संबधीच्या तक्रारीचा विचार या डाक अदालती केला जाईल. त्याच प्रमाणे ज्या तक्रारीमध्ये अधिकाऱ्यांकडे मूळ तक्रारी संबधित केल्या गेल्या त्यांच्या तारीख, नांव आणि पदनाम या सारखे तपशील असले पाहिजेत. तरी इच्छुक ग्राहक त्यांच्या तक्रारी दोन प्रतीमध्ये नितीन एस येवला, सिनिअर सुप.पोस्ट ऑफिस, नवीमुंबई विभाग वाशी यांच्याकडे दि.21 मार्च, 2024 रोजी किंवा त्यापूर्वी पोहोचतील असे आवाहन वाशी नवीमुंबई पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधीक्षक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.