मंत्रीमंडळ बैठक मंगळवार, दि. 28 जानेवारी, 2025 मंत्री मंडळ निर्णय (एकूण 1)

नगर विकास विभाग

अटल सेतूवर सध्याच्याच सवलतीच्या दराने आणखी एक वर्षभर पथकर आकारणी

अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर सध्या सुरू असलेल्या सवलतीच्या दरानेच आणखी एक वर्षभर पथकर आकारणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूच्या वापराकरिता यापुर्वी ४ जानेवारी २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत एमएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या दराच्या ५० टक्के सवलतीच्या दराने पथकर (कमीत कमी २५० रुपये इतका) आकारणीचा निर्णय घेण्यात आला होता. या दराचा एक वर्षानंतर आढावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक वर्षभर म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सध्या सुरु असलेल्या सवलतीच्या दरानेच पथकर आकारणीस मान्यता देण्यात आली.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात आलेला हा सुमारे २२ किलोमीटर लांबीचा अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू प्रकल्प १३ जानेवारी २०२४ पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मनपा कर्मचाऱ्यांनी घेतली मतदानाची शपथ

Tue Jan 28 , 2025
– राष्ट्रीय मतदार दिवस : नवमतदारांचा मनपाद्वारे सन्मान नागपूर :- नागपूर महानगरपालिका मुख्यालय आणि सर्व झोन कार्यालयांमध्ये शुक्रवारी (ता.२४) राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील दालनामध्ये मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाची शपथ घेतली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, उपायुक्त  विजया बनकर, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, मुख्य अभियंता  लीना उपाध्ये, सहायक आयुक्त श्याम कापसे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!