सी-20 परिषद ; पाहुण्यांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळ परिसराच्या सुशोभिकरणाची कामे अंतिम टप्प्यात

नागपूर :- येत्या आठवड्यात जी-२० परिषदेंतर्गत नागपुरात आयोजित होणाऱ्या सी-२० परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात सुशोभिकरणाची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. पाहुण्या देशांचे ध्वज, टायगर कॅपिटलची ओळख दर्शविणारी वाघाची प्रतिमा, स्वागतासाठी उभे असलेल्या महाराष्ट्राच्या पांरपरिक वेशातील दांपत्य, प्रसिद्ध लोकनृत्य लावणी चितारण्यात आलेली आकर्षक चित्रे आणि वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष लागवडीची कामे पूर्ण झाली असून उर्वरीत कामेही पूर्णत्वास येत आहेत.            येथील विमानतळावर सी-20 परिषदेसाठी येणाऱ्या देश-विदेशातील प्रतिनिधींचे आगमन होणार आहे. पाहुण्यांच्या स्वागतासाठी विमानतळ परिसर सज्ज होत आहे. स्थानिक प्रशासनाच्यावतीने सुरु असलेले विमानतळ परिसरातील सुशोभिकरणाची कामे अंतिम टप्प्यात पोहचली आहेत.        विमानतळातून बाहेर पडताच जी-20 परिषदेच्या सदस्य देशांचे ध्वज आणि नागपुरात सी-20 परिषदेसाठी येणाऱ्या प्रतिनिधींचे स्वागत करणारे ध्वज झळकली आहेत. विमानतळाच्या नाम फलकाखालील परिसरात वर्तुळाकार, त्रिकोणी आणि वेटोळया आकाराची टॉपअरी झाडे लावण्यात आली आहेत. पोर्चमधून बाहेर निघतांना पाहुण्यांच्या स्वगातासाठी महाराष्ट्राच्या पारंपरिक वेशभुषेतील उभे असलेल्या दांपत्यांची चित्रे चितारण्यात आली आहेत. महाराष्ट्राचा गौरव असलेली लावणी नृत्याची झलकही येथे दिसून येते.टाकाऊ वस्तुंपासून वाघाची सुंदर प्रतिमा येथील आकर्षण

दुचाकी, चारचाकी वाहनांच्या निरुपयोगी भागांपासून निर्मित वाघाची प्रतिमा येथील टर्मिनल मेनडोम परिसरात लावण्यासाठी सज्ज झाली आहे. टायगर कॅपीटल ही नागपूरची ओळख दर्शविणारी ही प्रतिमा आतापासूनच प्रवाशांसाठी आकर्षण ठरत आहे.

आकर्षक वृक्षांच्या पाच हजार कुंडया सजत आहेत

सी-20 परिषदेचे प्रतिनिधी विमानातून बाहेर पडल्यापासून पोर्चमध्ये येईपर्यंतच्या परिसरात बकुळ, रॉयल पाम, ट्रॅव्हलर पाम आदी 14 प्रजातींची वृक्षे पाच हजार कुंड्यांमध्ये लावण्यासाठी सज्ज होत आहेत.

व्हर्टीकल गार्डन, जी-२० च्या सदस्य देशांच्या राष्ट्रीय भाषेत नागपुरात आपले स्वागत आहे हा संदेश असणारे मोठे फलक उभारण्यात येत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘त्या’ रुग्णाचा मृत्यू इन्फ्लुएंझा H3N2 ने नाही

Thu Mar 16 , 2023
मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल : सर्व शासकीय व खासगी रुग्णालयात H1N1 सोबत H3N2 ची तपासणी करण्याचे निर्देश नागपूर : लक्ष्मीनगर झोनमधील ७२ वर्षीय रुग्णाचा झालेला मृत्यू हा इन्फ्लुएंझा H3N2 ने झालेला नाही, असा अहवाल इन्फ्लुएंझा H3N2 मृत्यू अन्वेषण समितीने सादर केला आहे, मृत्यू विश्लेषण समितीची बैठक मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत डॉ.निवृत्ती राठोड, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com