मनपातर्फे एस. टी. वर्कशॉप व सेंट मायकल शाळा येथे वृक्षारोपण कार्यक्रम

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे एस. टी. वर्कशॉप येथे १३ जुलै व नगिनाबाग येथील सेंट मायकल शाळा येथे १४ जुलै रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी आयुक्त विपीन पालीवाल,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपअभियंता रविंद्र हजारे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी आयुक्त विपीन पालीवाल यांनी विद्यार्थ्यांना झाडाचे महत्व समजावुन सांगितले, झाडे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तींना रोखतात, आपल्या शहरात मोठया प्रमाणात प्रदूषण,उष्णता असते यावर मात करण्यास वृक्षारोपणाची आवश्यकता आहे.

आज सेंट मायकल शाळा येथे वृक्षारोपण करण्यात आलेल्या वृक्षांचे जतन व संवर्धन शिक्षकांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी करावे. प्रत्येक विद्यार्थ्याने जर एका वृक्षाची जबाबदारी घेतली तर शाळेचा परिसर वृक्षमय होईल. सेंट मायकल शाळेतील कार्यक्रमात मुख्याध्यापिका प्रणाली कोल्हेकर, माजी नगरसेविका छबु वैरागडे, शिक्षक वर्ग व सर्व विद्यार्थी – विद्यार्थीनी यांची उपस्थिती होती तर एस. टी. वर्कशॉप येथील वृक्षारोपण कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,राज्य परिवहन महामंडळचे अधिकारी बिराजदार ,चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे सदस्य उपस्थीत होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खोडगाव जि.प. शाळेत उपसरपंचांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

Sat Jul 15 , 2023
– विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर फुलले हास्य रामटेक :- तालुक्याच्या सिमारेषेवर असलेल्या तथा ग्रामपंचायत काचुरवाही अंतर्गत येत असलेल्या खोडगाव येथील जिल्हा परीषद शाळेमध्ये उपसरपंच शिशुपाल अतकरे यांचे हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. खोडगाव जि.प. शाळेमध्ये १ ते ४ वर्ग आहे. येथे गावातील व परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेतात. दरम्यान नवीन सत्राची सुरुवात झाल्यावर अवघ्या काही दिवसातच या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!