नागपुर :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना आणल्याबद्दल आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो कारण महायुती सरकारने मध्यप्रदेश सरकार पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील दशकात भारत संपन्न झाला या दाव्याची सत्यता जगासमोर आणली आहे ,एकीकडे जो सर्वांना पोसणारा अन्नदाता याला फक्त ५०० रुपये सन्मान निधी दिल्यांनतर लाडकी बहीण योजना जाहीर करून राज्याचे जनतेची आर्थिक स्थिती व मोदींच्या संपन्न भारताची खरी परिस्थिती दाखविल्याबद्दल शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांनी धन्यवाद दिले आहे .
ज्या प्रमाणे राज्यभरातील कोट्यवधी गरीब महिला आता फक्त अर्ज करण्यासाठी त्यांची सर्व कामे सोडून देत आहेत घरा बाहेर पडत आहेत यावरून डबल इंजिन सरकार ने महाराष्ट्राची आर्थिक स्थितीची वाट लावली आहे,गेल्या 10 वर्षात कोट्यवधी नोकऱ्या देण्याचे आणि अर्थव्यवस्था सुधारण्याचा भाजपाचा मोठा जुमला असल्याचे सत्य या तिन्ही पक्षांनी नकळतपणे जगासमोर आणले आहे,अशी टीका किशोर तिवारी यांनी केली आहे
इंडिया आघाडीच्या खटाखट ८५००/महिना या घोषणेची नक्कल
महायुती सरकारने महाविकास आघाडीच्या योजनेचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला मात्र तिजोरी संपूर्णपणे रिकामी असल्यामुळे लाकडी बहिणीला दमडीही मिळणार नाही मात्र महाराष्ट्रात येणारे महाविकास आघाडीचे सरकार . गरीब महिलांसाठी ८५००/महिना देणार निश्चित आहे .सध्याच्या मिंधे सरकारची घोषणा विधानसभा निवडणुकीनंतरही टिकेल की नाही ही भीती आहे मात्र आज शिंदे-फडणवीस-अजित पवार निर्लज्जपणे जनतेने आता त्यांना मतदान करावे अशी मागणी करीत ,हा १५ लाख रुपये बँकांच्या खात्यात येणार शेतकऱ्यांचे दुप्पट होणार असेच आणखी एक जुमला होण्याची भीती व्यक्त करून या असंवैधानिक महायुती सरकार कमिशन मिळत नसल्यामुळे सत्तेत आल्यास बंद करतील अशी भीती किशोर तिवारी यांनी केली आहे.