मौजा पिलकापार शिवारातील ईलेक्ट्रीक पोल चोरी करणारी टोळी बुटु‌टीबोरी पोलीसांनी केली जेरबंद

बुटु‌टीबोरी :-दिनांक ०५/०७/२०२४ रोजी मौजा पिलकापार शिवारात फिर्यादी नामे आमिर बाबा शेख यांचे ईलेक्ट्रीक लाईनचे कामावरून कुणीतरी अज्ञात चोरांनी दिनांक ०५/०७/२४ चे १९:०० वा. ते दिनांक ०६/०७/२०२४ चे ०७:०० वा. दरम्यान फिर्यादीचे काम सुरू असलेल्या ठिकाणा वरून १) ९ मिटर लांबीचे ८ नग लोखंडी ईलेक्टीक पोल किंमती अंदाजे ३०,०००/- रू. २) ११ मिटर लांबीचे २ नग लोखंडी ईलेक्ट्रीक पोल किंमती अंदाजे १५,०००/- रू. व ३) ईतर साहीत्य ६०,०००/-रू. असा एकूण १,०५,०००/- रु. चा माल चोरी गेल्याचे फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे. ला अप. क्र. ५२६/२०२४ कलम ३०३ (२) भा.न्या.स. नोंद करून तपासात घेतला. सदर गुन्हयाचे तपासामध्ये अनोळखी आरोपीचा शोध घेत असतांना दिनांक १४/०८/२०२४ रोजी नागपुर वर्धा रोडवर गुन्हे प्रगटीकरण शाखा, पो.स्टें. बुट्टीबोरीचे अंमलदार पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे माहीती मिळाली की, एक ईसम मो.सा. क्र. एम.एच. ३४/टी. ४५१४ नी मौजा आजनगांव, घोडेबाट शिवारात संशयास्पद स्थितीत फिरत आहे अशा मिळालेल्या माहीती वरून गुन्हे प्रगटीकरण शाखाचे अंमलदार यांनी नमुद मो.सा. चालक याला ताब्यात घेवून विचारपुस केली असता सुरुवातीला तो उडवाउडविचे उत्तरे देवू लागला पोलीसांना त्यांचेवर संशय बळावल्याने त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने आपले नांव अनिल सुरेश शाहु वय २८ वर्ष रा. कटरे ले आउट, शनि मंदीर जवळ, कामठी रोड, कळमना नागपुर असे सांगीतले त्यास विश्वासात घेवून सदर ठिकाणी हजर राहणे बाबत विचारणा केली असता त्याने सांगीतले की, आरोपी व त्याचे काही साथीदार नामे १) अनिल सुरेश शाहु वय २८ वर्ष रा. कामठी रोड, कळमना नागपुर २) मोहम्मद शहील मोहम्मद शकील वय २४ वर्ष रा. आजरी माजरी रोड, नागपुर ३) अमोल राजेश उगले वय २४ रा. कळमणा नागपुर ४) नरेश श्रीराम तुरणकर वय ४० वर्ष रा. लोकमत कॉलनी, सातगांव ५) प्रमोद भुल्लन प्रजापती वय २९ वर्ष रा. कळमणा नागपुर यांचेसह चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीतांना ताब्यात घेवून त्यांचे कडून गुन्हयात वापरलेले वाहन १) पेंशन प्रो कंपनीची मा. सा. क. एम.एच. ३४ टी. ४५१४ किंमती २०,०००/- रू. २) अशोक लेलैंड दोस्त चार चाकी वाहन क्र. एम.एच. ४९ वि. झेड. २६७४ जुने वापरते किंमती २,००,०००/- रूः ३) चार चाकी वाहन क. एम.एच. ४० सि.डी. ३८२३ जुने वापरते किंमती २,००,०००/- रु ४) एक गॅस सिलेंडर व एक ऑक्सीजन सिलेंडर किंमती २,०००/- रू. ५) एक लोखंडी मोठी कैची व आरीचे पाते ५० नग एकुण किंमती ५००/- रू.६) ३८ नग ईलेक्ट्रीक पोलचे लहान मोठे तुकडे १००० किलो प्रति किलो ३० रू. प्रमाणे ३०,०००/- रू. ७) अॅल्युमीनीयम तारचा बंडल ५० फुट लांबीचा किंमती ८,०००/- रू. असा एकुण ४,६०,५००/- रू चा माल जप्त करण्यात आला.

सदर गुन्हयाचा तपास नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी, नागपुर विभाग नागपुर पुजा गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बुट्टीबोरी ठाणेदार प्रताप भोसले गुन्हे प्रगटीकरण शाखा, पो.स्टे. चुट्टीबोरीचे पोउपनि जगदीश पालीवाल, पोहवा आशिष टेकाम, युनुस खान, प्रविण देव्हारे, कृणाल पारधी, पोशि गौरव मोकडे, माधव गुट्टे, दशरथ घुगरे यांनी केली असुन सदर गुन्हयाचा तपास पोहवा युनुस खान करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपीस अटक, वाहनासह एकूण ४०,५०,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

Mon Aug 19 , 2024
भिवापूर :- दिनांक १७/०८/२०२४ रोजी पोलीस भिवापूर येथील स्टाफ पोलीस स्टेशन भिवापूर ह‌द्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, भिसी हायवे रोडकडुन नांद गावाकडे टिप्पर अवैधरीत्या विनारॉयल्टी जात आहे. अशा मिळालेल्या विश्वसनिय माहिती वरून नमुद घटनास्थळी नाकाबंदी केली असता स्टाफसह नांद रोड सालेभट्टी शिवार येथे १) एम एच ४० सी डी ९९७५ चा चालक शाहरूख रउफ खान वय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com