बुट्टीबोरी :- दिनांक २७/०६/२०२४ चे रात्री पोउपनि मुन्नसिंग ठाकुर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन बुट्टीबोरी येथील स्टाफ वाय पॉईंट येथे पेट्रोलिंग करीत असतांना स्टाफ यांना दुरूनच लाईटाचा उजेड दिसला, पोस्टे बुट्टीबोरी स्टाफ रोडचे कडेला गाडी थांबवुन ट्रक क्र. एब आर- ५५ ए.एल. ३५५२ च्या चालकाला नाव गाव विचारले असता त्याने अपले नाव एजाज वल्द समिर अहमद वय २६ वर्ष रा पर्वभिकाई सोनार पो रामबक्शगढ़ ता गौरा जामो जि. अमेठी उत्तरप्रदेश असे सांगीतले त्याला वाहणामध्ये काय आहे असे विचारले असता तो बरोबर सांगत नव्हता स्टाफला त्याचे बोलण्या वरूण संशय आल्याने त्याचा वाहणाची पाहणी केली असता त्याचे वाहणामध्ये सुगंधी गुटका चा वास येत होता सदर आरोपी चालक नामे एजाज वल्द समिर अहमद वय २६ वर्ष रा पर्वभिकाई सोनार पो. रामवक्शगढ़ ता. गौरा जामो जि. अमेठी उत्तरप्रदेश हा ट्रक क्र. एच आर ५५ ए.एल ३५५२ च्या वाहनामध्ये खालील मुद्देमाल वाहतुक करतांनी आढळून आला १) राज निवास पान मसाला पॉकेट प्लास्टीक पोते १८४ किं ८०,५४७८४ २) सेंटेड टोबोंको पॉकेट ३५ किंमती १८,४८०००/- असा एकून ९९०२७८४/- रू तसेच अशोक लेलँन्ड कंपनीचा ट्रक ज्याची किंमती ३०,०००० असा एकून १,२९,०२७८४/- रू चा माल आरोपीतांकडुन जप्त करण्यात आलेला असुन आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन बुट्टीबोरी येथे कलम ३२८, २७२, २७३. आणि अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ से कलम २६ (१) २६ (२) (iv) ३० (२) सह कलम ३(१) (अ) सहकलम ५९ सह महाराष्ट्र शासनाचे अधिसुचना क्र. अ.सु.मा. अ/अधिसुचना ४९६/२०२३/७ दि १८/०७/२०२३ अधिनियम प्रमाणे गुन्हा नोद करून तपासात घेण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी नागपुर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोनि हृदयनाराण यादव ठाणेदार पो. स्टे. बुटीबोरी, पोउपनी मुन्नासिंग ठाकुर, अंगरक्षक (काशिनाथ घुबडे) सफौ सुरेश घवराळ पोहवा रामराव आडे, अरविंद बव्हाण, पोलीस अंमलदार प्रविण खंडारे किष्णा राठोड नितेश राठोड यांनी पार पाडली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि मुन्नासिंग ठाकुर, पो.स्टे. बुटीबोरी हे करित आहे.