अट्टल गुन्हेगाराकडुन बुट्टीबोरी पोलीसांनी केले माऊजर व ५ जिवंत काडतुस जप्त

बुट्टीबोरी :- पोलीस स्टेशन बु‌ट्टीबोरी येथे कार्यान्वीत गुन्हे प्रगटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार हे वरीष्ठांच्या आदेशाप्रमाणे पो स्टे अभिलेखावरील गुन्हेगार व अवैध्य धंदयावर कार्यवाही करण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना मुखबीरद्वारे मिळालेल्या माहीती तरूण एक इसम नागपुर वर्धा जाणा-या रोडवर उभा असुन त्याच्याजवळ माऊजर आहे. अशा माहीतीवरूण गुन्हे प्रगटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार त्या ठिकाणी पोहोचुन त्याची व त्याच्या ताब्यातील थैलीची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील थैलीत एक विदेशी बनावटीचे माऊजर किंमती अंदाजे ३००००/- व ५ जिवंत काडतुस किंमती ५००/-रू, असा एकूण ३०५००/- रू चा मुद्देमाल मिळून आला अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे. ला अप, क्र. ४७५/२४ कलम ३/२५ भारतीय हत्यार कायदा अन्वये सदरचा गुन्हा नोंद असुन तपासावर आहे.

सदर गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी नामे शुभम उर्फ शेरू अशोक उईके वय २४ वर्ष रा. वार्ड नं २ खापरखेडा बौध्द विहार जवळ ता सावनेर जि नागपुर याचे ताब्यातुन एक विदेशी बनावटीचे माऊजर कि अंदाजे ३००००/- व ५ जिवंत काडतुस किंमती ५००/- असा एकूण ३०५००/- रू चा माल मिळुन आला सदर आरोपी हा अट्टल गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द पो स्टे खापरखेडा येथे खुन खंडणी व अवैध्यरीत्या अग्नीशस्त्र बाळगणे सारख्ये गंभीर गुन्हे दाखल आहे तसेच हा आरोपी पोस्टे खापरखेडा येथून अवैध्यरीत्या अग्नीशस्त्र बाळगणे या गुन्हयात ०८ दिवसापासुन फरार होता.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी पुजा गायकवाड व पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांचे मार्गदर्शनाखाली गठीत विशेष पथकातील अधिकारी सपोनी प्रशांत लभाणे, पोहवा आशिष टेकाम, पोहवा युनूस खान, पोहवा कुणाल पारधी, पोहवा अरविंद चव्हाण पोशि दशरथ घुगरे पोशि प्रदीप देशमुख यांनी कामगिरी पार पाडली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि प्रशांत लभाने पोस्टे बु‌ट्टीबोरी हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपीतांना अटक

Wed Jun 26 , 2024
पारशिवनी :- स्थानिक गुन्हे शाखा नाग्रा येथील स्टाफ पो. स्टे. पारशिवनी हद्दीत अवैध रेती संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय खबर द्वारे माहिती मिळाली की, मौजा डोरली येथे ट्रक द्वारे अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून घटनास्थळी नाकाबंदी केली असता दोन ट्रक विनापरवाना अवैध रेती वाहतुक करताना मिळुन आले. टाटा कंपनीचा १० चक्का ट्रक क एम एच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com